शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेह आजाराबाबत होणार जनजागृती

By admin | Updated: October 29, 2016 00:46 IST

आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी यावर्षीपासून धन्यंतरी जयंती ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.

जिल्हा परिषदेत कार्यक्रम : प्रथम ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ चंद्रपूर : आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी यावर्षीपासून धन्यंतरी जयंती ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. यावर्षी शुक्रवार २८ आॅक्टोंबरला प्रथम ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थामध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. ‘आयुर्वेदाद्वारे मधुमेहाचे प्रतिबंधन व नियंत्रण’ असा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस प्रबोधनाचा विषय होता. २४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा होत आहे. यानिमित्त सर्व आरोग्य संस्थामध्ये २८ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत मधुमेह जनजागृती अभियान आयोजित केला जाणार आहे. या अभियानात शासनाचे आयुष विभाग, असांसर्गिक रोग (एन.डी.डी.) विभाग यासह विमलादेवी आयुर्वेद महाविद्यालय वांढरी, खाजगी आयुर्वेद व्यावसायिक, आयुर्वेद व्यासपीठ, निमा संघटना यांचाही सहभाग राहणार आहे. नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुणालय येथील आयुष विभाग, शासकीय दवाखाने येथून आयुर्वेद चिकित्सा प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)