लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ३७ वर्षांपूर्वी नामवंत लेखक, साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लावलेल्या वटवृक्षाच्या साक्षीने आनंदवनात शुक्रवारी पु.ल. देशपांडे स्मृती खुल्या रंगमंचाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पु. ल. च्या अनेक आठवणींना उजाळा दिला.यावेळी डॉ. विकास आमटे डॉ. भारती आमटे, डॉ. शीतल आमटे, माजी आमदार जयवंत ठाकरे, प्रा. धनंजय गुडसूरकर, प्रभाताई चाफेकर, गौतम करजगी, प्रा. एस. एन माटे उपस्थित होते. स्वरानंदनच्या कलावंतांनी सादर केलेल्या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तुळशीचे रोपटे देऊन पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले. महारोगी सेवा समितीच्या कार्यात मागील चाळीस वर्षांपासून योगदान देणारे नारायण हाके , गिरीधर राऊत , डॉ. विजय पौळ, सुधाकर कडू, सदाशिव ताजणे यांनी पु. ल. च्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. रोहित फडतरे यांनी तयार केलेल्या आनंदवन गाईड अॅपचे उद्घाटनही पार पडले. प्रा. गुडसूरकर लिखित डॉ. बाबा आमटे यांच्यावरील निखाºयावरचा प्रवास या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुडसूरकर यांनी बाबांच्या जीवनावर जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिलेल्या १०१ व्याख्यानादरम्यान मिळालेल्या ७१ शाली आनंदवनसाठी यावेळी भेट दिल्या. प्रास्ताविक रवी नलगिंटवार तर संचालन दीपक शिव यांनी केले.
आनंदवनात पु. ल.च्या आठवणीत साकारला रंगमंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:26 IST
३७ वर्षांपूर्वी नामवंत लेखक, साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लावलेल्या वटवृक्षाच्या साक्षीने आनंदवनात शुक्रवारी पु.ल. देशपांडे स्मृती खुल्या रंगमंचाचे लोकार्पण करण्यात आले.
आनंदवनात पु. ल.च्या आठवणीत साकारला रंगमंच
ठळक मुद्देउजाळा : आनंदवन गाईड अॅपचा शुभारंभ