शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:40 IST

शेतकरी कुटुंबातील अनेक आई-वडिल अल्प शिक्षित असतात. नातलगातही फारसे उच्च शिक्षित नसतातच. मात्र आई-वडिलांचे आपल्या मुलाला मोठा साहेब बनविण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते अपार कष्ट करीत असतात.

ठळक मुद्देजिवतीतील जगदीशचे यश : कठोर परीश्रम व जिद्द हेच यशाचे गमक

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : शेतकरी कुटुंबातील अनेक आई-वडिल अल्प शिक्षित असतात. नातलगातही फारसे उच्च शिक्षित नसतातच. मात्र आई-वडिलांचे आपल्या मुलाला मोठा साहेब बनविण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते अपार कष्ट करीत असतात. अशाच एका शेतकरी कुटुंबातील मुलाने जिद्द व चिकाटीच्या भरोशावर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करीत दारूबंदी अधिकारी या पदासाठी पात्र ठरला आहे. त्याने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश हे प्रेरणादायी व देदिप्यमान आहे. ही कहाणी आहे जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवरील महाराजगुडा येथील जगदिश उत्तम पवार या युवकाची.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जगदिश पवारचे दहावीपर्यंतचे शिक्षण जिवती तालुक्यातच झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांने वरोरा येथील आनंदनिकेतन येथे पूर्ण केले. वर्षानुवर्षे पहाडावरील शेतकºयांना दुष्काळी चटके बसत असतानाही आई-वडिलांनी जगदिशला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तयार केले. यावेळी अनेकांनी त्यांना टोमने मारले. मात्र मुलाला घडविण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली. या संधीचे सोने करण्यासाठी ‘मी नक्कीच अधिकारी बनेल’ असे स्वप्न जगदिशने मनात बाळगून पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.दरम्यान २०११ मध्ये झालेल्या पीएसआय परीक्षेत त्याची काही मार्काने अंतिम निवड हुकली. त्यानंतर सन २०१३ मध्येही यशाने हुलकावणी दिली. पुढे तीन वर्ष सतत अपयश आल्यानंतरही जगदिशने हार मानली नाही. आपल्या प्रतिकूल परिस्थितीची जाणिव ठेवून तेवढ्याच जिद्दीने पुन्हा दिवसरात्र अभ्यास केला. आणि सन २०१७ मध्ये झालेल्या दारूबंदी पीएसआय पदाच्या परीक्षेत यश मिळवत अखेर आपल्या व आपल्या आईवडिलांच्या कष्टाचे चिज करीत पीएसआय पदासाठी पात्र ठरला.पहाडावर शिक्षणाचा अभाव असतानाही खेड्यातला मुलगा एमपीएससी उत्तीर्ण करुन पीएसआय पदासाठी पात्र होतो. हा अभिमान जगदिश पवारच्या आई- वडिलांच्या चेहºयावर दिसून येत आहे. आपण संपूर्ण आयुष्यात तारेवरची कसरत सोसली. परंतु, मुलाला त्याच्या ध्येयापासून कधिच विचलीत होऊ दिले नाही. याची जाणीव ठेवत जगदिशने आपल्या आई-वडिलांचे व स्वत:चे स्वप्न पूर्ण केले. जगदिशचा आदर्शचा घेत जिद्दीने प्रयत्न करीत तालुक्यातील युवकांनी अधिकारी बनावे, असा विश्वास पवार कुटुंबीयांनी लोकमतजवळ व्यक्त केला.

टॅग्स :Policeपोलिस