शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीआरटी थांबविणार मानव - वन्यजीव संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

संपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. धोका असलेल्या जंगलात जाण्यापासून गावातीलच नागरिक गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष निश्चितच टाळता येणार आहे

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्क ब्रम्हपुरी :  जंगलालगतच्या गावातील मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाकडून गावागावात पीआरटी (प्राथमिक बचाव दल) स्थापन करण्यात आले आहे.  यामुळे गावातीलच नागरिकांच्या सहकार्याने व जनजागृतीने येत्या काळात मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभणार आहे. ब्रम्हपुरी वनविभागाची व्याप्ती फार मोठी आहे. वनविभागाची उत्तर व दक्षिण अशी दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. उत्तर वनविभागाचे क्षेत्र जवळपास १४ हजार हेक्टर तर दक्षिण वनविभागाचे क्षेत्र १६ हजार हेक्टर आहे. येथे साग, अंजन, बेहडा, सालई,  मोहगणी, मोह, तेंदू, चार, धावडा, बिना, खैर, हीवर, सैना, शिवण, बांबू आदी वृक्ष आहेत.  येथील वातावरण वन्य प्राण्यांकरिता पोषक असल्याने विविध पशू, पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच वाघ व बिबट मोठ्या  संख्येत आहेत.      मागील पाच वर्षात दोन्ही विभागात जंगलालगतच्या गावांतील  जवळपास २०  नागरिकांचा बळी गेला आहे. अनेकांवर हल्ले होऊन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक पाळीव जनावरांचाही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हा संघर्ष टाळता यावा, यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाने गावागावात पीआरटीची स्थापना केली आहे. 

पीआरटींना दिले जाणार विशेष प्रशिक्षणसंपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. धोका असलेल्या जंगलात जाण्यापासून गावातीलच नागरिक गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष निश्चितच टाळता येणार आहे

३३ गावात १६५ प्राथमिक बचाव दल३३ गावात प्रत्येकी पाच असे एकूण १६५ पीआरटी स्थापन करण्यात आले आहेत. गावातील नागरिक, गुराखी यांना जंगलात जाण्यापासून थांबविणे, वृक्षतोड थांबविण्यात मोलाचे सहकार्य लाभणार आहे. जनजागृतीमुळे मानव - वन्यजीव संघर्ष पीआरटीच्या सहकार्याने टाळता येणार आहे.

मानव - वन्यजीव संघर्ष रोखण्याच्या उद्देशाने ब्रम्हपुरी वनविभागातर्फे गावकरी व वनविभागामधील दुवा म्हणून प्राथमिक बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. मानव - वन्यजीव संघर्ष टाळता यावा, जीवितहानी होऊ नये याकरिता केलेला हा एक चांगला प्रयत्न आहे.- पी.एच. ब्राम्हणेवनपरिक्षेत्राधिकारी, उत्तर, ब्रम्हपुरी. 

टॅग्स :forest departmentवनविभाग