शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्हावासीयांना नियमित पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:59 IST

नियोजन भवन येथे शनिवारी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत मार्च २०१९ अखेर शंभर टक्के म्हणजेच २९९ कोटी रुपये एवढा निधी जिल्ह्याच्या विकासाकरिता खर्च करण्यात आला.

ठळक मुद्देपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरी विभाग असु द्या की ग्रामीण विभाग प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळावे, याकरिता अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपण शिक्षण आरोग्य पाणी याकरिता विशेष योजना असलेले असून पाणी पुरवठा करण्यात अधिकाऱ्यांनी हयगय करू नये. पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होणार असून त्यादरम्यान जिल्ह्याच्या विकासाची गती कायम ठेवावी, अशा सूचना राज्याचे वित्त, नियोजन, विशेष सहाय्य, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.नियोजन भवन येथे शनिवारी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत मार्च २०१९ अखेर शंभर टक्के म्हणजेच २९९ कोटी रुपये एवढा निधी जिल्ह्याच्या विकासाकरिता खर्च करण्यात आला. तर २०१९-२० या आर्थिक वषार्साठी जिल्हा वार्षिक योजनेकरिता ३७५ कोटी एवढा निधी मंजूर झाला असून या वर्षात ऑगस्ट अखेर १०४ कोटी निधी खर्च झाला असून खर्चाची एकूण टक्केवारी ४२ टक्के एवढी आहे. या बैठकीमध्ये नाविन्यपूर्ण योजनांना मान्यता देण्यात आली. तसेच चालू वर्षाचे पुनर्नियोजन करण्यात आले.याप्रसंगी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार बाळू धानोरकर, खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या अध्यक्ष अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.या बैठकीमध्ये विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे भरण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच काही आवश्यक पदे भरायची असून त्याची प्रक्रिया सुरू लवकर सुरू करावी. सोबतच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला काही यंत्रसामुग्री गरजेची असेल, तर त्यासंदर्भातील मागणी अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार