शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी क्षेत्रातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविम्याचा लाभ द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:11 IST

विजय वडेट्टीवार यांची मागणी : सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यात सन २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी संबंधितांकडे तक्रार नोंदवली. मात्र, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे विमा कंपन्यांकडून अद्याप हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. या पीक विम्याचा लाभ तत्काळ द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

सावली तालुक्यातून २८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. विमा कंपनीकडून पाहणीअंती ७ हजार ५०० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. ब्रह्मपुरी तालुक्यात ४० हजार २६४ विमाधारक शेतकऱ्यांपैकी ५ हजार ६४५ नुकसानग्रस्तांनी तक्रार नोंद केली. सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या २० हजार २६३ एवढी आहे. यापैकी हजारो शेतकऱ्यांना पीक विमा लाभ मिळालेला नाही. सणासुदीचे दिवस आहे. बँकेचे व हात उसने कर्ज व सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची दैनावस्था झाली. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी प्रचंड संकटात आहे. अन्नदात्याला दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागत आहे. शासनाच्या दुर्लक्षित धोरणाने शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. बियाणे, खते व इतर साहित्याचे वाढलेले प्रचंड भाव यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

केवळ खोट्या आश्वासनांची खैरातसत्ता प्राप्तीसाठी सरकारने केवळ खोट्या आश्वासनांची खैरात वाटली. योजनांचा डंका वाजवला. सरकार तुपाशी व शेतकरी उपाशी अशी स्थिती आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याचा सरसकट लाभ मिळाला नाही. या संपूर्ण प्रकाराला राज्यातील महायुती सरकार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे हलगर्जी धोरण कारणीभूत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारchandrapur-acचंद्रपूर