आपत्तीत नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:28+5:302021-07-23T04:18:28+5:30

राजुरा : नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे अनेकांनी घरे क्षतिग्रस्त झाली. जनावरे वाहून गेलीत. वीज कोसळून अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. ...

Provide immediate assistance to those affected by the disaster | आपत्तीत नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या

आपत्तीत नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या

Next

राजुरा : नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे अनेकांनी घरे क्षतिग्रस्त झाली. जनावरे वाहून गेलीत. वीज कोसळून अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. गेल्या दोन वर्षांपासून अनेक शेतकरी व नागरिक आर्थिक मोबदल्यापासून वंचित आहेत. हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना अनेकांना आर्थिक मोबदला न मिळाल्याने गोरगरीब कुटुंब अडचणीत सापडले आहेत. अशा नागरिकांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

राजुरा मतदारसंघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात अतिवृष्टी व वीज पडून अनेकांची घरे कोसळली. तसेच शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहे. परंतु, संबंधित कुटुंबांना व शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून मोबदला मिळाला नाही. शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. ऐन हंगामाच्या दिवसात शेतकऱ्यांच्या कुटुंबांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे, असेही धोटे यांनी म्हटले आहे.

Web Title: Provide immediate assistance to those affected by the disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.