शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना उत्तमोत्तम उपचार देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:11 IST

देशातील गरीबांना उत्तमोत्तम उपचार अगदी मोफत, सुलभ व सहज मिळावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित आरोग्य मेळाव्याने अनेक रुग्णांना आरोग्याच्या योजना, उपचार पध्दती व उपचार सोयी प्राप्त झाल्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंद व्यक्त केला.

ठळक मुद्देहंसराज अहीर : चांदा क्लबवरील रोगनिदान, उपचार महामेळाव्याची सागंता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील गरीबांना उत्तमोत्तम उपचार अगदी मोफत, सुलभ व सहज मिळावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित आरोग्य मेळाव्याने अनेक रुग्णांना आरोग्याच्या योजना, उपचार पध्दती व उपचार सोयी प्राप्त झाल्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंद व्यक्त केला. गरिबांना उत्तमोत्तम उपचार देण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन ना. अहीर यांनी केले. शुक्रवारी या मेळाव्याची सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे, दोन दिवसात आठ हजाराच्या जवळपास रुग्णांना या मेळाव्यातून मोफत उपचार देण्यात आले.या समारोपाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमहापौर अनिल फुलझेले, समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.बी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे तसेच चंद्रपूर शहरातील तज्ज्ञ व नामावंत डॉक्टरमंडळी उपस्थित होते.या दोन दिवसीय महामेळाव्यात आठ हजार रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून त्यांच्यावर वेगवेगळया आजाराची मोफत तपासणी करुन उपचार करण्यात आले. मधुमेहग्रस्त बालकांना उत्तम प्रतिचे ग्लुकोमिटर वाटप करण्यात आले असून मधुमेह आजारावर उपचार भरपूर आहेत. पण गरीब व सर्वसाधारण कुटुंबातील जनतेसाठी ते खूप खर्चिक आहे. त्यामुळे गरिबी संपवायची असेल तर सर्वांना औषधोपचार मिळाला पाहिजे, असे ना.अहीर यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ. एम. जे. खान यांचा गुणगौरव करण्यात आला. या आरोग्य मेळाव्याला सहकार्य केलेल्या सर्व डॉक्टर मंडळीचासुध्दा सन्मान करण्यात आला. तसेच चंद्रपूर येथे ५० वर्षांपासून प्रदीर्घ सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग या सर्व विभागांनी या आरोग्य मेळाव्याला विशेष सहकार्य केल्याबद्दल ना.अहीर यांनी सर्वांचे कौतुक केले.