शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांना एकरी २५ हजारांची मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:24 IST

ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांच्या शेतात तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया विविध रोगांनी कहर केल्यान भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले.

ठळक मुद्देकिसान क्रांती मोर्चा : विविध कीडरोगांनी शेतीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांच्या शेतात तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया विविध रोगांनी कहर केल्यान भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या पिकाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. .ब्रह्मपुरी, नागभीड तालुके हे धान उत्पादन करणारे तालुके म्हणून ओळखले जातात. विविध प्रकारच्या तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या धान पिकावर यंदा तुडतुडा, करपा, मावा यासारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यावर्षी उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भात पीक घेणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विविध प्रकारच्या औषधांचे फवारण्या करूनही रोगांवर नियंत्रण होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यानंतरही शेतकºयांनी हिंमत ठेवून करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकºयामध्ये सरकारविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. शासनाने व प्रशासनाने ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील सर्व शेतकºयांच्या शेतातील धान पिकाचे सर्वेक्षण करून ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यासह संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने एकरी २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी. याकरिता बुधवारी शेतकरी सुकाणू समिती किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीद्वारा ब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयासमोर धानाच्या पेंढ्या दाखवून सरकारचा निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देताना तालुका किसान क्रांती समन्वयक विनोद झोडगे, प्रा.अमृत नखाते, नामदेव नखाते, डॉ. प्रेमलाल मेश्राम, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, गोपाल मेंढे, डॉ.विलास मैंद, रामदास कामडी, अनिल कांबळे, प्रकाश खेवले, भगवान मेश्राम, भाऊराव राऊत, शरद ठाकरे, सरपंच बोधडा, महेश पिलारे, चिंतामण म्हस्के, किसन मेश्राम आदींसह पिंपळगाव, सोंद्री, भालेश्वर, लाडज, चिखलगाव, पारडगाव, खामतळोधी, सोनेगाव, सावलगाव, बोडधा, मुडझा, बल्लारपूर, भूज, धामणगाव, रणमोचन, तुलानमेंढा, मौशी, बाळापूर, मेंडकी, नवेगाव (मेंडकी), कुडेसावली, हळदा, पद्मापूर, बेटाळा, बरडकिन्ही, नांदगाव येथील शेतकरी उपस्थित होते.