लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीत मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण हटवून खुल्या प्रवर्गात भरती सुरू केल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीने गुरुवारी (दि. १६) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवेदन दिले होते. जिल्हा बँकेसमोर २ जानेवारीला सुरू झालेल्या साखळी ठिय्या आंदोलनाचे रूपांतरण गुरुवारपासून आमरण उपोषण करण्यात आले.
जिल्हा बँकेतील नोकर भरतीत एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण संपवून नियमबाह्य प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीने केला. याविरूद्ध जिल्हा बँकेसमोर २ जानेवारीपासून साखळी ठिय्या आंदोलन सुरू आहे. बँकेने आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे गुरुवारपासून आमरण उपोषण सुरु राज्यपालांनी केले. बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती देण्यास शासनाला भाग पाडावे, अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी राजू कुकडे, संजय कन्नावार, नभा वाघमारे, अनुप यादव, आनंद इंगळे, मिलिंद खोब्रागडे, दिनेश एकवनकर, सूर्या अडबाले, महेश वासलवार आंदोलनकर्ते उपस्थित होते.
राहुल गांधींना पाठविले शेकडो पत्र विरोधी पक्ष नेते राहूल गांधी लढत असताना त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आरक्षण हटवून नोकर भरती सुरू आहे. एस.एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूस व महिला आरक्षण लागू करून नव्याने नोकर भरती प्रक्रिया राबवावी, या मागणीचे शेकडो पत्र राहुल गांधी यांना आंदोलकांनी पाठविले आहे.