शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेची योग्य अंमलबजावणी करा

By admin | Updated: March 11, 2017 00:47 IST

केंद्र शासनाच्या २०२२ पर्यंत सर्वांना घरे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची योग्य अंमलबजावणी करावी, ...

हंसराज अहीर यांचे निर्देश : ग्रामीण भागात ८५०० घरांची योजनाचंद्रपूर : केंद्र शासनाच्या २०२२ पर्यंत सर्वांना घरे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची योग्य अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आवास योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, अनिल फुलझेले आदी उपस्थित होते.यावेळी ना. अहीर म्हणाले, सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी भागात लागू करण्यात आली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी आतापासूनच केल्यास २०२२ पूर्वीच निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल. ग्रामीण भागासाठी आठ हजार ३६३ घरांची योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेशिवाय रमाई आवास, शबरी आवास, आदीम आवास तसेच पंडीत दिनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात घरांची उपलब्धता वाढवावी. तसेच बेघरांना तातडीने घरे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले.चंद्रपूर महानगरात शहरी आवास योजनेतून बेघर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. यात २१ हजार ७०० अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १९ हजार ४०८ अर्जाची तपासणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यात झोपडपट्टी पुर्नविकास, कर्ज संलग्न अनुदान खासगी भागीदारी अंतर्गत घरांची निर्मिती आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनुदान योजनेंतर्गत आलेल्या अर्जाचा निपटारा करून प्राधान्याने काम करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात विकासनगर, दत्तनगर, मित्रनगर येथील प्रस्ताव तयार करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी विविध विभागाच्या जमिनी उपलब्ध होत असल्यास संबंधित विभागाकडे पाठवून पाठपुरावा करावा, असे निर्देश ना. अहीर यांनी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)