शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:11 IST

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून आणि परिश्रमातून राज्यात लागू झालेला जादूटोणाविरोधी कायदा हा अतिशय क्रांतीकारी आहे. कायद्याचा जनमाणसात प्रभारीरित्या प्रचार-प्रसार आणि प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी झाल्यास जनसामान्यांचे अंधश्रद्धांमुळे होणारी फसवणूक व शोषण थांबेल.

ठळक मुद्देश्याम मानव : विकास केंद्रातील बैठकीत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून आणि परिश्रमातून राज्यात लागू झालेला जादूटोणाविरोधी कायदा हा अतिशय क्रांतीकारी आहे. कायद्याचा जनमाणसात प्रभारीरित्या प्रचार-प्रसार आणि प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी झाल्यास जनसामान्यांचे अंधश्रद्धांमुळे होणारी फसवणूक व शोषण थांबेल. अंधश्रद्धांना बळी पडलेल्यांना न्याय मिळणे सोपे होईल. याकरिता अंनिस कार्यकर्त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी प्रसार व प्रचारासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन अ. भा. अंनिसचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी येथे केले.अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नियोजन आणि अंमलबजावणी मंडळाच्या स्थानिक विकास केंद्र येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अंनिसचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, राष्ट्रीय महासचिव हरिश देशमुख, प्रकल्प संचालक सुरेश झुरमुरे, अशोक घाटे, अ‍ॅड. गणेश हलकारे, आदींसह नियोजन व अंमलबजावणी मंडळाचे देशभरातील सदस्य उपस्थित होते.सदर बैठकीत संघटन बांधणी, लढा अंधश्रद्धा निर्मूलनाचा, समाज माध्यमांचा प्रभावी उपयोग, विद्यापीठ, महाविद्यालय व शालेय स्तरावरील अभियान, युवा-विद्यार्थी व महिला संघटन आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. पुढील वाटचालीच्या नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली.यावेळी अ.भा.अनिस चंद्रपूर जिल्हा शाखा बल्लारपूर शाखा, अनिसचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे, जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड गोविंद भेंडारकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, निलेश पाझारे, तालुका संघटक राजेश गावंडे, मंगेश नैताम, चंद्रकांत पावडे, सुरेश पंदीलवार, सचिन दुधे, रजनी कार्लेकर, अविनाश आंबेकर, भारती रामटेके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :shyam manavश्याम मानव