शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

युवा अधिकाऱ्यांमुळे विकासाला मिळणार चालना

By admin | Updated: January 17, 2017 00:35 IST

तालुक्यातील गाव विकास तसेच शहर विकास हा अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेवर अवलंबून असते.

मूल तालुका : एसडीओंपासून मुख्याधिकाऱ्यांपर्यंत युवा अधिकारी मूल : तालुक्यातील गाव विकास तसेच शहर विकास हा अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेवर अवलंबून असते. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री स्व. मा.सा. कन्नमवार व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल तालुक्याला युवा अधिकाऱ्यांची ब्रिगेट लाभली आहे. स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होऊन विविध पदावर विराजमान होत विकासाचा ध्यास घेतलेल्या अधिकाऱ्यांकडून जनतेच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविकच आहे. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, तहसीलदार राजेश सखदे, संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरवढे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे अधिकारी स्पर्धा परीक्षेतून आल्याने सामाजिक, शैक्षणिक व गाव विकासाचा ध्यास असणे स्वाभाविकच आहे. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या मूल तालुक्याला अधिकाऱ्यांची युग ब्रिगेट लाभली आहे. शहर व गाव विकास साधताना या अधिकाऱ्यांची साथ घेतल्या गेली तर शहर व गाव विकासाला फार मोठे योगदान लाभण्याची शक्यता आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी माहिती व्हावी यासाठी विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ते तत्पर असतात. आपण ज्या प्रमाणे प्रयत्न केला, त्याचप्रमाणे गावातील युवक घडावीत. संस्कारी युवापिढी देशासाठी भविष्यकाळ असल्याने त्यांच्यात स्पर्धा परीक्षेबरोबरच काम करण्याची जिद्द व आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास युवकांना प्रेरणादायी ठरु शकते. शहर व गाव विकास म्हणजे केवळ नाली व रस्ते बांधणे नव्हे तर प्रत्येकांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी रोजगार निर्मिती हेही महत्वाचे काम आहे. मूल शहराबरोबरच तालुक्यातील गावात शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यात पाहिजे त्या प्रमाणात स्पर्धा नाही. सामाजिक जाणिवेचा अभाव पदोपदी जाणवतो. यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शहर व गाव विकासाठी कुठलेही राजकारण न आणता अधिकाऱ्यांना सोबत घेतले तर तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक वातावरण निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार राजेश सखदे, महसूल विभागाबाबत तत्पर आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे हे कायद्यात तर संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरबळे व मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे गाव व शहर विकासासाठी अग्रक्रमी आहेत. संवर्ग विकास अधिकारी पांढरवळे आजही आपले काम सांभाळून रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करीत आहेत. त्यात इतरांची भर पडली तर आपल्या भागातील विद्यार्थी सुसंस्कारीत व सक्षम होण्यासाठी मोलाचा हातभार लाभेल. (तालुका प्रतिनिधी)रोजगार निर्मितीसाठी हातभार लागेलमूल तालुका रोजगार व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याने रोजगारांच्या संधी व शैक्षणिक वातावरण निर्मिती होण्यास अधिकाऱ्यांची साथ मिळाल्यास मूल शहराबरोबर तालुका देखील रोजगार मुक्त व शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाईल. अधिकाऱ्यांची साथ घ्यायला सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तीनी राजकारण न आणता आपल्या गावातील शहरातील युवापिढी सक्षम होण्यास पुढाकार घेतल्यास फायद्याचे ठरेल.