शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

इंटकच्या अधिवेशनात केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध

By admin | Updated: February 3, 2015 22:52 IST

राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाच्या (इंटक) महाधिवेशनात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. कंत्राटी कामगारांंचे शोषण, कोल इंडियाच्या भागिदारीनंतर

चंद्रपूर : राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाच्या (इंटक) महाधिवेशनात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. कंत्राटी कामगारांंचे शोषण, कोल इंडियाच्या भागिदारीनंतर कामगार कायद्यात झालेले बदल याविषय या अधिवेशनात ठराव घेण्यात आले. स्थानिक दुर्गापूर वसाहतीमधील सद्भावना सभागृहात एक दिवसीय महाअधिवेशन पार पडले. अध्यक्षस्थानी आर. के. चिब होते. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील वेकोलिच्या सर्व क्षेत्रातील निवडक २०० प्रतिनिधींनी यात भाग घेतला. संघटनेचे वरीष्ठ नेते माजी आमदार एस. क्यू. झामा, पेंच-कन्हान क्षेत्राचे कामगार नेते आमदार सोहन वाल्मिकी, नागपूर-वर्धा क्षेत्राचे कामगार नेते के.के. सिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ कामगार नेते यावेळी मंचावर उपस्थित होते. कामगार नेते एस. क्यू झामा, सोहन वाल्मिीकी, कामगार नेते के.के.सिंग आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना वक्त्यांनी सध्यापरीस्थितीवर चिंता व्यक्त केली. वेकोलिचे उत्पादन ४५ मिलियन टनावरून ३९ मिलियन टनावर घसरले. नवे व्यवस्थापकीय संचालक मिश्रा यांनी संघटनांसोबत चर्चा करुन वकोलिचे उत्पानद वाढविण्यासाठी नियोजन केले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अधिवेशनादरम्यान कामगारांची रॅली काढण्यात आली. यात ३५० दुचाकी आणि २०० वर चारचाकी वाहने सहभागी झाली होती. रॅलीच्या समारोपप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. ते म्हणाले, कामगारांची आणि त्यांच्या संघटेनेची मोठी शक्ती आहे. मात्र या शक्तीचा उपयोग विकासाठी व्हायला हवा. यापुढे आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी आपल्या भाषणादरम्यान दिले. या अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात संघटनेची केंद्रीय कार्यकारिणी आणि नागपूर-वर्धा क्षेत्राची कार्यकारिणी आणि पाथरखेडा क्षेत्राच्या कार्यकारिणीच्या निवडणुका पार पडल्या. यात राधेश्याम सिंग अध्यक्ष तर, एस.क्यू. जामा यांची महामंत्री पदी निवड करण्यात आली. वरिष्ठ प्रतिनिधींसोबत चर्चा करून कार्यकारिणी गठित करण्याचा अधिकार यावेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. नागपूर-वर्धा क्षेत्रासाठी के. के. सिंग यांची तर, पेंच कन्हान क्षेत्रासाठी सोहन वाल्मिीकी, पाथरखेडा क्षेत्रासाठी आर.के. चिंब आणि दामोदर मिश्रा यांची निवड करण्यात आली. या सर्वांना कार्यकारिणी निवडीचे अधिकार देण्यात आले. के.के. सिंग यांच्या संयोजनाखाली हे महाअधिवेशन पार पडले. संचालन जिया उल हक यांनी तर आभार विजय टेनपे यांनी मानले. अधिवेशनात मोठ्या संख्येने कामगार वर्ग सहभागी झाला होता. (जिल्हा प्रतिनिधी)