शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

ऑनलाईन पब्जी मोबाईल गेमला प्रतिबंध घालावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

ऑनलाईन पब्जी मोबाईल गेममुळे वेळेचे भानच नसते. रात्रभर मुले खेळत असतात. आई वडिलांनी आवाज दिला असता तरी मुले बोलत नाही. त्याच्या मनात भीती निर्माण होते. स्वभाव चिडचिडा होतो. झोप आणि भूक लागत नाही. या खेळामध्ये चोरी व हत्या करणे हेच शिकवले आहे. शत्रूला मारण्याची भावना त्याच्या कोवळ्या मनात निर्माण होत आहे. जीवघेण्या खेळामुळे पालक त्रस्त झाले आहे. विद्यार्थांची अभ्यास करण्याची मानसिकता नाही.

ठळक मुद्देनऊ संघटनांची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : भारतामध्ये पब्जी मोबाईल ऑनलाईन गेम सुरू आहे. यामुळे विद्याथी ऑनलाईन खेळाकडे वळला. देशात दररोज १२ कोटी मुले हा खेळ आठ तास खेळतात. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करून गुन्हेगारीकडे वळत आहेत असा देशातील नामांकित संस्थांचा निष्कर्ष असल्याने भारतात ऑनलाईन पब्जी मोबाईल गेमला प्रतिबंधित घालण्याची मागणी तालुक्यातील आठ संघटनांनी उपविभागीय अधिकारी प्रकाश संगपाल यांच्याकडे निवेदनातून केली आहे.ऑनलाईन पब्जी मोबाईल गेममुळे वेळेचे भानच नसते. रात्रभर मुले खेळत असतात. आई वडिलांनी आवाज दिला असता तरी मुले बोलत नाही. त्याच्या मनात भीती निर्माण होते. स्वभाव चिडचिडा होतो. झोप आणि भूक लागत नाही. या खेळामध्ये चोरी व हत्या करणे हेच शिकवले आहे. शत्रूला मारण्याची भावना त्याच्या कोवळ्या मनात निर्माण होत आहे. जीवघेण्या खेळामुळे पालक त्रस्त झाले आहे.विद्यार्थांची अभ्यास करण्याची मानसिकता नाही. खेळामुळे कुटुंबामध्ये नैराश्याचे वातावरण असल्याने यावर बंदी घालण्याची मागणी निवेदनातून करण्यात आले. निवेदन देताना युथ इन्स्पायर क्लबचे अध्यक्ष राकेश जीवतोडे, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, शिव साम्राज्य प्रतिष्ठान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, समाधान फाउंडेशन, अनुलोम संस्था, नेहरू युवा केद्र, विद्यार्थी शिक्षण कल्याण संघटना, आदिवासी गोंड विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.फायदे कमी मात्र नुकसान अधिकमहाराष्ट्रामध्ये पब्जी खेळामुळे जीवघेण्या घटना घडल्या आहेत. या खेळावर बंदी आणावी, यासाठी पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा खेळ भारतातील नसून साऊथ कोरियाचा आहे. खेळाचा उद्देश मनोरंजन करणे असला तरी फायदे कमी व नुकसान जास्त असा आरोप विविध संघटनांनी केला आहे.

टॅग्स :PUBG Gameपबजी गेम