शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सहा एकर शेतीत घेतले १०० क्विंटल मिरचीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST

फोटो प्रकाश काळे गोवरी : शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. शेतीवर केलेला खर्चही भरून निघत नाही. ...

फोटो

प्रकाश काळे

गोवरी : शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. शेतीवर केलेला खर्चही भरून निघत नाही. एवढी शेतीची अवस्था बिकट होत असतानाच, राजुरा तालुक्यातील पोवनी येथील युवा प्रगतिशील शेतकरी प्रफुल्ल बाबाराव कावळे(३२) यांनी आपल्या सहा एकर शेतात मिरचीची लागवड केली होती. मिरचीच्या आधुनिक पद्धतीने लागवड केलेल्या शेतीतून त्यांना चांगलेच विक्रमी उत्पादन मिळत आहे.

आजपर्यंत त्यांनी १०० क्विंटल मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले असून, त्यांना १५० क्विंटल मिरचीचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. निसर्गाची अवकृपा, नापिकी, कर्जबाजारी यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शेतीवर केलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची होरपळ सुरूच आहे. मात्र, राजुरा तालुक्यातील पोवनी येथील युवा प्रगतिशील शेतकरी प्रफुल्ल कावळे यांनी आपल्या सहा एकर शेतात तीन प्रकारच्या मिरचीची आधुनिक लागवड केली आहे. शेतकरी प्रफुल्ल बाबाराव कावळे यांची पोवनी गावालगत शेती आहे. या शेतात त्यांनी ६ एकर शेतात यंदा मिरचीचे पीक घेतले आहे. प्रारंभी मिरचीवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. मिरचीवर अतोनात खर्च केल्यानंतर कसेबसे पीक हाती येण्याची आशा पल्लवीत झाली. प्रफुल्ल कावळे यांचे शेताचे सभोवताल वेकोलीच्या कोळसा खाणींनी मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. या मातीच्या ढिगाऱ्यावर काटेरी झुडपे वाढल्याने वन्यप्राणी भरदिवसा शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात, परंतु हे सारे वन्यप्राण्यांचे उपद्व्याप सहन करीत प्रफुल्ल कावळे यांनी मोठ्या उमेदीने मिरचीची शेती केली आहे. त्यांनी आजपर्यंत १०० क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले असून, पुन्हा ५० क्विंटल मिरचीचे उत्पादन अपेक्षित आहे.

बॉक्स

नागपूर बाजारपेठेत मागणी

यंदा मिरची पिकाला नागपूर बाजारपेठेत १५ हजार रुपयांपर्यंत चांगला दर असल्याने, शेतकऱ्यांना बऱ्यापैकी नफा मिळण्याची शक्यता आहे. निसर्गाचा लहरीपणा, नापिकी, यामुळे शेतीवर अवकळा आल्याने शेतकरी कर्जबाजारी होतात, परंतु ६ एकर शेतात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेऊन प्रफुल्ल कावळे या युवा शेतकऱ्याने शेती करणे सोडू पाहणाऱ्या हताश झालेल्या असंख्य शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण दाखविला आहे.

कोट

निसर्गाची अवकृपा, शासनाचे शेतकरी विरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा येत आहे. नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी हताश न होता आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली, तर नक्कीच शेतीत भरघोस उत्पादन येईल. आजपर्यंत १०० क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले असून, पुन्हा ५० क्विंटलपर्यंत असे एकूण १५० क्विंटलपर्यंत मिरचीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे.

- प्रफुल्ल कावळे प्रगतिशील युवा शेतकरी, पोवनी