स्वच्छता कामगारांचाही सत्कार
भद्रावती : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत भद्रावती नगरपालिकेतर्फे शहरात व्हाॅट्सॲपद्वारे खुल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
१ ते १६ वयोगटातील खुल्या निबंध स्पर्धेत प्रथम बक्षीस रक्षणधा शेख, द्वितीय दिव्यंका मेश्राम, तृतीय ओमकार बावणे यांनी पटकावले. १६ वर्षांपेक्षा अधिक वयोगटात प्रथम बक्षीस वैष्णवी बुरडकर, द्वितीय सुबोध कानोडे, तृतीय रुची मते, तर एक ते १६ वयोगटातील खुल्या चित्रकला स्पर्धेत पहिले बक्षीस गुंजन लुनावत, द्वितीय पर्णवी भाले, तृतीय शुभ्राश्री कुंठावार तसेच १६पेक्षा अधिक वयोगटात पहिले बक्षीस गुंजन मिसाल, दुसरे स्वप्निल रामटेके व तृतीय साहिल आत्राम यांनी पटकावले. तसेच यश कांबळे, नैतिक डोर्लीकर, हिमांशू हनुमंते, जितेश हुरकट, उमाकांत शेंडे, श्रेया बुरडकर या स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले तसेच स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२१ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल स्वच्छता कामगारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बाजीराव नान्हे, मुन्नीबाई फुलमोगरा, दादाजी बारसागडे, तृप्ती हिरादेवे, रत्नमाला खडसे, सागर वानखेडे, प्रियंका टोंगे यांचा समावेश आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, उपाध्यक्ष संतोष आमने, सभापती चंद्रकांत खारकर, रेखा कुटेमाटे, प्रफुल्ल चटकी, सुधीर सातपुते, विनोद वानखेडे तसेच अन्य सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.