शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुडन्यूज ! पत्नीच्या प्रसूतीसाठीही कैद्यांना मिळू शकते रजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 07:29 IST

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित रजा (फर्लो) आणि अभिवचन रजेच्या (पॅरोल ) माध्यमातून काही  दिवसांसाठी कारागृहातून बाहेर येता येते. संचित रजा २१, तर अभिवचन रजा ४५ दिवसांपर्यंत असते.

ठळक मुद्देशिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित रजा (फर्लो) आणि अभिवचन रजेच्या (पॅरोल ) माध्यमातून काही  दिवसांसाठी कारागृहातून बाहेर येता येते. संचित रजा २१, तर अभिवचन रजा ४५ दिवसांपर्यंत असते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही यापुढे पत्नीच्या प्रसूतीसाठीही अभिवचन तसेच वंचित रजेसाठी अर्ज करता येणार आहे.  त्यामुळे बाप बनणाऱ्या कैद्याला मुलांच्या जन्माच्या वेळी उपस्थित राहता येईल. राज्याच्या तुरुंग विभागाने जारी केलेल्या या अधिसूचनेची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित रजा (फर्लो) आणि अभिवचन रजेच्या (पॅरोल ) माध्यमातून काही  दिवसांसाठी कारागृहातून बाहेर येता येते. संचित रजा २१, तर अभिवचन रजा ४५ दिवसांपर्यंत असते.  विवाह मृत्यू अशाप्रसंगी ‘डीआयजी’च्या मंजुरीने दिल्या जातात, अभिवचन रजा मंजूर करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. ‘डेथ’ फर्लोच्या माध्यमातून १४ दिवसांची रजा मंजूर होते. याचे अधिकार कारागृह अधीक्षकांना आहेत. कैद्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यास तसेच त्याच्यामुळे इतरांना धोका असल्याचे मत झाल्यास रजा मंजूर होत नाही. सक्षम प्राधिकाराकडून रजेच्या अर्ज नामंजूर करण्यात आल्यास संबंधित कैदी उच्च न्यायालयात दाद मागू शकतो. संचित आणि अभिवचन रजेवर कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यास रोज किंवा आठवड्यातून दोन दिवस संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागते. राज्य शासनाने कारागृह (मुंबई संचित व अभिवचन रजा) नियम १९५९ मध्ये सुधारणा केली आहे. १३ जुलै २०२१ रोजी याबाबतची अधिसूचना जारी झाल्यानंतर अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

खात्री पटली तरच पत्नीच्या प्रसूतीच्या वेळी काही कागदोपत्री कारवाई करावी लागते. पती नसल्याने अडचण होते, हे लक्षात आल्याने राज्य सरकारने नियमांत सुधारणा केली. ‘आकस्मिक अभिवचन’ रजेवर सोडण्याचा अर्ज प्राधिकाऱ्याने नाकारल्यास कैद्याला पाच दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करता येणार आहे. विभागीय आयुक्तांची खात्री पटल्यास पाच दिवसांनंतरही अर्ज करता येणार आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरjailतुरुंग