शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

हृदय शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधानांकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:35 IST

पंतप्रधान हे देशाचे असतात, तिथे सर्वसामान्यांची कैफीयत कुणी ऐकत नाही, असाच आजपर्यंत गावखेड्यात ऐकण्यास मिळत होते.

५० हजार रूपयाचे सहाय्य : मोठेगाव येथील विद्यार्थिनीने मांडली होती पत्रातून कैफीयतराजकुमार चुनारकर चिमूरपंतप्रधान हे देशाचे असतात, तिथे सर्वसामान्यांची कैफीयत कुणी ऐकत नाही, असाच आजपर्यंत गावखेड्यात ऐकण्यास मिळत होते. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान असुनही ते मातीशी कसे जुळले आहेत, याचा अनुभव चिमूर तालुक्यातील मोठेगाव येथील हृदयरुग्ण किरण नथ्थु मांडरे या सतरा वर्षीय विद्यार्थिनीच्या परिवाराला खुद्द पंतप्रधानांनी उपचारासाठी दिलेल्या मदतीने आला आहे. दिल्ली ते चिमूर या हजारो किलोमीटर अंतरावरून ग्रामीण भागातील आदिवासी गावात मदत आली. त्यामुळे पंतप्रधान सर्वसामान्यांशी किती आपुलकीने जुळले आहेत, याचा अनुभव मोठेगाव येथील मांडरे परिवाराला आला आहे. चिमूर तालुक्यातील मोठेगाव या तीन हजार लोकवस्तीच्या गावात नथ्थुजी मांडरे यांचे कुटुंब रोज मजुरी करून आपले जीवन जगत आहेत. लता व नथ्थु मांडरे यांच्या संसार वेलीवर प्रमोद व किरण या दोन अपत्यांनी जन्म घेतला. नथ्थु मांडरे यांना एक एकर शेती असल्याने या शेतीवर परिवाराचा गाढा चालत नव्हता. त्यामुळे लता व नथ्थु हे रोज मजुरी करून आपल्या दोन मुलाचे पालनपोषण करीत होते. नथ्थु मांडरे यांचा एकुलता एक असलेला प्रमोद मागील चार महिन्याआधी कॅन्सर आजाराने मृत पावला. त्यातच मुलगी किरण मागील अनेक वर्षापासून हृदयरोगाने ग्रस्त होती. त्यामध्ये मुलगा अल्प वयात सोडुन गेल्याने लता व नथ्थु यांचा म्हातारणाचा आधार गेल्याचे दु:खाचा डोंगर या परिवारावर कोसळला. त्यात किरण हृदयरोगाने ग्रस्त, त्यामुळे परिवाराचे पालनपोषण व किरणच्या उपचाराचा प्रश्न नथ्थु मांडरे यांच्यापुढे उभा ठाकला होता.आर्थिक अडचणीने किरणवर उपचार व तिचे शिक्षण कसे करायचे या विवंचनेत. किरण गावातीलच लोकविद्यालयात दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. मात्र प्रकृती व आर्थिक अडचणीमुळे किरणने दहावीतून शाळा सोडली व घरच्यांना कामात हातभार लावत होती. मात्र एकुलता एक मुलाच्या जाण्याचे दु:ख व किरणच्या हृदयरोगाचे दु:ख नथ्थुला स्वस्थ बसू देत नव्हते. किरणच्या उपचारासाठी डॉक्टरानी दोन ते तीन लाखाचा खर्च सांगितला. एवढा पैसा कसा जमवायचा हा मोठा प्रश्न मांढरे परिवारापुढे ठाकला होता.याच दरम्यान चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यातर्फे आयोजित आरोग्य शिबिरातून तपासणी करत येथील उपसभापती विलास कोयम यांच्या सहकार्याने नागपूर येथे उपचार सुरू करण्यात आले. अशातच सतरा वर्षीय किरणने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे आपली कैफीयत मांडली. या पत्राची दखल घेत चक्क नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय कोष मधुन २२ डिसेंबर २०१६ ला किरणला चक्क पत्र पाठवून ५० हजाराची मदत करण्याचे कळविले. ही मदत व राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या मदतीने आमदार भांगडियाचे आरोग्य समन्वयक देवेन गणविर यांच्या सहकार्यातून किरणच्या हृदयाचे वॉल बदलवण्यात येणार आहे. चक्क प्रधानमंत्री या गरीब विद्यार्थिनीच्या पत्राची दखल घेत मदतीचा हात दिल्याने ते सर्वसामान्याची जाणीव करतात, असा अनुभव मांढरे कुटुंबाला आला आहे.