शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:18 IST

शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या चित्ररथाव्दारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी : ३१ जुलैपर्यंत विमा काढण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या चित्ररथाव्दारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भात, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर व कापूस इत्यादी पिकांचा विमा काढण्याचे आवाहन या रथाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी तसेच पावसातील खंड, किड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येऊन आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. या सर्व बाबीचा विचार करुन शासनाने खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली आहे.या योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळणार आहे. या योजनेत कर्जदार शेतकºयांनी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम तारीख २४ जुलै ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वरील सर्व पीकांचा विमा काढून या योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क करावा.तर बिगर कर्जदार शेतकºयांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून येत्या खरीप हंगामापासून शेतकºयांचे कर्ज व विमा हप्ता सी.एस.सी. मार्फत आॅनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे.सी.एस.सी.ई.गर्व्हनंस सव्हीर्सेस इंडिया लिमिटेडद्वारे कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्रातर्फे या कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यास मदत करणार आहेत. तेव्हा शेतकºयांनी विमा काढण्यासाठी सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक राहणार आहे.या चित्ररथाद्वारे जिल्हयात ३१ जुलैपर्यंत विविध गावांमध्ये जाऊन प्रधानमंत्री पीक विम्याशी संबंधित माहिती शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे या योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाटील यांनी केले आहे. यासाठी त्यांच्याकडून प्रभावी जनजागृतीही केली जात आहे.