शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले २२०० रुपयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:47 IST

वृक्षतोड थांबावी. घराघरात चुलीऐवजी गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाक व्हावा, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली.

ठळक मुद्देलाभार्थी महिलांची ‘लोकमत’जवळ कैफियत : गॅस भरून देण्यासाठीही मागतात १७०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वृक्षतोड थांबावी. घराघरात चुलीऐवजी गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाक व्हावा, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. कोरपना तालुक्यात एका गॅस एजन्सीने आदिवासी महिलांकडून तब्बल २२०० रुपये घेऊन या योजनेत कनेक्शन दिले. इतकेच नव्हे, तर सिलिंडर संपल्यानंतर गॅस एजन्सीकडून पुन्हा १७०० रुपये मागितले जात आहेत. मग ही योजना कशासाठी, अशी कैफियत कोरपना तालुक्यातील रायपूर येथील लाभार्थी महिलांनी सोमवारी ‘लोकमत’ कार्यालय गाठून मांडली.गडचांदूर येथील मिताशा इंडेन गॅस एजंसीचे प्रतिनिधी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांची यादी घेऊन गावात आले होते. त्या यादीत नावे असणाऱ्यांनी २२०० रुपये जमा करा आणि योजनेतून गॅस कनेक्शन घ्या, असे सांगितले. उसणवारी घेऊन रक्कम जमा केली व गॅस कनेक्शन घेतले. रकमेची पावती दिली नाही. असाच प्रकार इतरही गावात घडला. गॅस कनेक्शनचे कार्ड दिले.पण त्यावर ग्राहक क्रमांकच नाही. महिना दोन महिन्यांनी सिलिंडर संपले असता सदर गॅस एजन्सीना कळविले. मात्र पुन्हा १७०० रुपये जमा करावे लागणार असे सांगितले. योजनेच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गडचांदूर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांना ही बाब सांगितली. त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली असता एसडीओंना गॅस एजन्सीवर कारवाईचे आदेशही दिले. मात्र समस्या सुटली नाही, अशी व्यथाही यावेळी रायपूर येथील लाभार्थी महिलांनी सांगितली.कोरपना तालुक्यातील रायपूर, शिवापूर, गोविंदपूर, कोथोड(बु.) व कोथोड (खुर्द) ही सर्व गावे शंभर टक्के आदिवासी गावे आहेत. या गावातील महिलांकडून मिताश गॅस एजन्सीने प्रत्येकी २२०० रुपये घेऊन पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन दिले. आता सिलिंडर संपले. ते भरून देण्यासाठी पुन्हा १७०० रुपये मागत आहे. याबाबत एजंसी मालकाशी संपर्क केला तर फोन लागत नाही. येत्या ९ एप्रिलपर्यंत या महिलांना सिलिंडर भरून मिळाले नाही, तर सिलिंडर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.- अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, अध्यक्ष, श्रमिक एल्गार.लाभार्थ्यांच्या नावांची यादी एजंसीने गावात पाठविली. गॅस सोडविण्यासाठी २२०० रुपये मागितले. उसणवारी करून रक्कम जमा केली. याची पावतीही दिली नाही. त्यांनी कनेक्शन आॅनलाईनसुद्धा करून दिले नाही. गॅस संपल्यानंतर ते भरून द्या म्हटले, तर पुन्हा १७०० रुपये मागितले. यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली.- कल्पना प्रकाश आत्राम, लाभार्थी, रायपूर. ता. कोरपना.याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार आली आहे. तक्रारीवरून शहानिशा करण्यासाठी आम्ही पुरवठा विभागाला माहिती दिली आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करणार आहे.- विनोद रोकडे, ठाणेदार, गडचांदूर