शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षण यशस्वी जीवनाचा पाया

By admin | Updated: June 30, 2016 01:16 IST

प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या बालमनावर योग्य संस्कार शिक्षकांच्या माध्यमातून केले जातात.

रिता जिलटे : विसापुरात पाठ्यपुस्तक व गणवेश वितरणबल्लारपूर : प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या बालमनावर योग्य संस्कार शिक्षकांच्या माध्यमातून केले जातात. आज घडीला इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वळत असला तरी, मराठी माध्यमाच्या शाळेतून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असून प्राथमिक शाळा शिक्षणात यशस्वी जीवनाचा पाया म्हणून पालकांनी विचारा करावा, असे मत विसापूरच्या सरपंच रिता जिलटे यांनी केले. बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत विसापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वस्ती विभागात मंगळवारी शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश वितरण व पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते.प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रिता जिलटे, ग्रामपंचायत सदस्य सचिन टोंगे, मुख्याध्यापक रेखा कुलटे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अरुण जीवने, प्रतिभा टेकाम, अर्चना धोटे, नंदा वडस्कर, बेबी राऊत, रोहिणी धोटे, सविता वडस्कर, सुरेखा धोट, सोनाली पिंपळकर, पंचशिला पाटील यांच्यासह पालकांची उपस्थिती होती. दरम्यान ‘मुलगा-मुलगी एक समान, दोघांनाही शिकवा छान’ संदेश देणारी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शाळेत आयोजित कार्यक्रमात वर्ग एक ते चवथीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली पिंपळकर यांनी तर आभार पंचशिला पाटील यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)