शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

भूमिपुत्राच्या कार्याला राष्ट्रपती पदकाची मोहर

By admin | Updated: January 26, 2017 01:30 IST

चिमूर क्रांतीभुमिपासून ११ किलो मिटर अंतरावर असलेल्या नेरी येथे लहानपणापासून बाळकडू घेत

नेरीच्या अतुल फुलझेलेंचा होणार गौरव : शिक्षकाच्या मुलाची देशसेवेसाठी अशीही धडपड राजकुमार चुनारकर  चिमूर चिमूर क्रांतीभुमिपासून ११ किलो मिटर अंतरावर असलेल्या नेरी येथे लहानपणापासून बाळकडू घेत प्राथमिक शिक्षण घेवून वैद्यकीय पदवी घेत दीड वर्षे ग्रामीण जनतेला आरोग्याची सेवा दिली. मात्र याही पेक्षा देशाची सेवा करण्याच्या ध्येयाने प्रेरीत झालेले डॉ. अतुल फुलझेले २००१ च्या तुकडीत आयपीएस झाले व दहा वर्षे हिमाचल सारख्या राज्यात सक्षम सेवा दिली. आता आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई येथे सीबीआयमध्ये कार्यरत असलेल्या क्रांती नगरीतील डॉ. अतुल फुलझेले या भूमिपुत्राच्या कार्याला प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती पदाची मोहर लागणार आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूर क्रांतीचे नाव आजही अजरामर आहे. याच तालुक्यातील नेरी या गावात जनता प्राथमिक शाळा व जनता हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढील ११ व १२ वी आनंदवन महाविद्यालय वरोरा तर एमबीबीएस यवतमाळ येथून केले. वैद्यकीय शिक्षणानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा व खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी सेवा दिली. या सेवेपेक्षा दुसरी काही तरी वेगळी सेवा करावी, या महत्त्वाकांक्षेमुळे डॉ. अतुल फुलझेले यांनी वैद्यकीय सेवेला पूर्णविराम देत प्रशासकीय क्षेत्र निवडले. देशाच्या दुश्मनासोबत लढण्याचा व देशासाठी काही तरी करावे, या हेतुने प्रेरीत होवून वैद्यकीय अधिकारी पदाचा त्याग करीत त्यांनी सन २००१ च्या हिमाचल कॅडरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस सेवा सुरू केली. त्यामध्ये कागडा, उना येथे सेवा देत सलग दहा वर्षे हिमाचल प्रदेशात उत्कृष्ट सेवा दिली.डॉ. फुलझेले यांच्या हिमाचल प्रदेशातील कार्यकाळात प्रामुख्याने धर्मशाळा येथे प्रथम आयपीएल क्रिकेट मॅच दरम्यान रोड मॅपची आजही तेवढ्याच प्रखरतेने आठवण केली जाते. या अगोदर डॉ. अतुल फुलझेले यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन २००९ मध्ये डी. जी. पी. डिस्कर व २०१० मध्ये शिमला येथेही पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. डॉ. फुलझले यांच्या उत्कृष्ट कार्याची केंद्र सरकारने दखल घेत २०११ मध्ये सी.बी.आय. शाखेसाठी निवड केली. आजच्या घडीला डॉ. अतुल फुलझेले मुंबई येथे सी.बी.आय.मध्ये डी.आय.जी. म्हणून देशाला सेवा देत आहेत. त्यांच्या या सेवेची दखल घेत केंद्र सरकार प्रजासत्ताक दिनी त्यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करणार आहे. क्रांतीभूमीतील एका शिक्षकाच्या मुलाला देश सेवेसाठी दिलेल्या योगदानाने तालुक्यासह जिल्ह्याची मान अभिमानाने ताट झाली आहे.