शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रामदेवबाबाच्या योग प्रशिक्षणाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:01 IST

जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत योगाचे शिक्षण व प्रसार करण्यासाठी मूल येथे योगगुरु रामदेवबाबा यांना पाचारण केले आहे.

ठळक मुद्देआरोग्याचा मंत्र देणार : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत योगाचे शिक्षण व प्रसार करण्यासाठी मूल येथे योगगुरु रामदेवबाबा यांना पाचारण केले आहे. मंगळवार दि. २० फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या योग प्रशिक्षणासाठी रामदेवबाबा उपस्थित राहून योगाचे धडे देणार आहे. यादृष्टीने कर्मवीर महाविद्यालयाच्या परिसरात भव्य शामियाना उभारण्यात येत आहे. यासाठी भाजपाचे पदाधिकारी व पतंजली योग समितीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहे.तालुक्यातील प्रत्येक गावात प्रसिद्धी करीत आहेत. एकंदरीत संपूर्ण योग प्रशिक्षणाच्या तयारीच्या दृष्टीने ८ ते १० कार्यकर्त्यांच्या जवळपास २०० समित्या तयार करण्यात आलेल्या आहे. यासाठी हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे कार्यकर्ते मूल शहरात आश्रयाला आहेत.ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय इको पार्कच्या समोरील पटांगणावर योग प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची चारचाकी वाहने ठेवण्याच्या दृष्टीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर मागील बाजूला दोन चाकी वाहनाची पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. नगरपालिका, पोलीस प्रशासनाकडून वारंवार प्रस्तावित योग प्रशिषण स्थळाला भेट देत आहेत. प्रशासनानेही यासाठी सक्रिय सहभाग घेतलेला दिसत आहे.तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचे आयोजन डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय व पतंजली सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पतंजली सेवा समितीचे शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय मूल शहराचे अध्यक्ष अजय गोगुलवार यांच्या नेतृत्वात विविध समित्या गठित केलेल्या आहेत. सदर शिबिरात २१ फेब्रुवारी सकाळी ५ ते ७.३० पर्यंत योग शिकविल्या जाईल.ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात दारुबंदी करतानाच अनेक विकासकामांना वेग दिला. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील बल्लारपूर, चंद्रपूर, मूल बसस्थानकाच्या नुतनीकरणासह माजी राष्टÑपती एपीजे अब्दुल कलाम गार्डन, इको गार्डन, ताडोबा अभयारण्यात आगरझरी येथे फुलपाखरु गार्डन, चंद्रपूर शहरात पिण्याच्या पाण्याची योजना, इरई नदीचे सौंदर्यीकरण, बांबू प्रशिक्षण केंद्रासह अनेक विकासकामांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये असलेली वनौषधी लक्षात घेता शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, यासाठी आता पतंजली योग केंद्राची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य सुधारावे. तसेच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगानेही हे आरोग्य शिबिर महत्त्वाचे आहे. या शिबिरासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय व पतंजली योग समिती परिश्रम घेतले जात आहे. जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, सभापती ब्रिजभूषण पाझारे, मनपा सभापती राहुल पावडे, महापौर अंजली घोटेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, प्रमोद कडू, संध्या गुरुनुले यांच्यासह हजारो कार्यकर्ते व्यवस्थेमध्ये आहेत.