शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरण पोहोचले पंचायतीत मात्र कमी वयामुळे लग्न टळले

By admin | Updated: June 4, 2016 00:45 IST

महाविद्यालयीन शिक्षण घेताना सूत जुळले. मात्र काही दिवसांनी घरच्यांसमोर या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

शासनाचा आदेश कायम : प्रेमीयुगूल झाले नाराज गोंडपिपरी : महाविद्यालयीन शिक्षण घेताना सूत जुळले. मात्र काही दिवसांनी घरच्यांसमोर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्यामुळे दोघांनाही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी गाव पंचायत बोलाविण्यात आली. मात्र प्रियकर व प्रेयसी दोघेही अल्पवयीन असल्याने पुढचे शिक्षण घ्या, असा निर्णय पंचायतीने दिल्याने दोघांचाही हिरमोड झाल्याचा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखितवाडा येथे बुधवारी घडला.गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखितवाडा येथील एका युवतीचे वढोली येथील युवकाशी महाविद्यालयीन शिक्षण घेताना सुत जुळले. ते दोघेही गोंडपिपरी येथे शिक्षण घेत होते. कॉलेजच्या निमित्ताने त्यांच्या नियमित भेटीगाठी सुरू होत्या. ते पुढील आयुष्याचे स्वप्न रंगवू लागले. मात्र एक दिवस ‘त्या’ युवतीचा मोबाईल तिच्या आई-वडिलांच्या हाती लागला. मोबाईल कुणाचा, कुठून आला असे विविध प्रश्न विचारून, यापुढे हा सर्व प्रकार बंद कर, असा दम दिला. मात्र पे्रमाचा विरह तिला सहन होईना. तिने घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती आपल्या प्रियकराला दिली. आताच्या आता लग्न कर अन्यथा जीवाचे बरेवाईट करील, असा संदेश त्याला मोबाईलवरून पाठविला. तो वाचून प्रियकरालाही काय करावे, काय नाही हे सुचेना. त्याने हिंमत करून सर्व प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. कुटुंबीयांनी प्रकरण गावपुढाऱ्यांसमोर मांडले. तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. वढोली तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लग्नासाठी पुढाकार घेऊन प्रियकर व त्याच्या आईवडिलासह बुधवारी चेकलिखितवाडा येथील प्रेयसीचे घर गाठले. चेकलिखितवाडा येथील तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलाविण्यात आले. दोन्ही गावातील तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांत बराच वेळ चर्चा झाली. शासनाचा नियम समोर करीत दोघांचेही लग्नासाठी असणारे वय तपासण्यात आले. मात्र दोघांचेही वय कमी असल्याने लग्न करून देण्यास तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. (शहर प्रतिनिधी)