शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:07 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या गर्भवती महिलेवर येथील डॉक्टरांनी योग्य उपचार केला नाही. त्यामुळे त्या गर्भवती महिलेचा रूग्णालयातच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदेवाडा आरोग्य केंद्रातील प्रकार नातेवाईकांचा रूग्णालयात ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या गर्भवती महिलेवर येथील डॉक्टरांनी योग्य उपचार केला नाही. त्यामुळे त्या गर्भवती महिलेचा रूग्णालयातच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात ठिय्या आंदोलन करून रोष व्यक्त केला.सोनाली अर्जुन कुळसंगे (२१) रा. देवाडा असे मृत महिलेचे नाव आहे. सोनालीला रात्रीच्या सुमारास ताप व उलट्याचा त्रास होवू लागला. त्यामुळे घरच्यांनी तिला रात्री १२ वाजता देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपस्थित डॉक्टरांनी तिच्यावर थातुरमातुर उपचार करून दुर्लक्ष केले. प्रकृतीची साधी विचारपुसही केली नाही. त्यामुळे सोनालीची प्रकृती जास्तच खालावल्याने पहाटे ४ वाजताच्या सुमारास तिचा रूग्णालयातच मृत्यू झाला. सोनाली ही सात महिन्यांची गर्भवती होती.ही घटना माहित होताच सकाळी गावातील नागरिक रूग्णालयावर धडकले. डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळेच सोनालीचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईक व गावकऱ्यांनी करीत रूग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरूद्ध रूग्णालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे रूग्णालय प्रशासनाने राजुरा पोलिसांना पाचारण केले. राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख, ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईक व गावकºयांची समजूत काढत घटनेला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईक परतले.

टॅग्स :Healthआरोग्य