शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रद्युम्न बरडेचा खुनी निघाला वर्गमित्रच

By admin | Updated: May 17, 2017 00:37 IST

तालुक्यातील नांदगाव (पोडे) वेकोलि वसाहतीत राहणारा व चंद्रपूर येथील परॉमाऊंट कान्व्हेंटमध्ये ...

तपास महिनाभर : गळा आवळून डोक्यावर दगडाने प्रहारबल्लारपूर : तालुक्यातील नांदगाव (पोडे) वेकोलि वसाहतीत राहणारा व चंद्रपूर येथील परॉमाऊंट कान्व्हेंटमध्ये इयत्ता १० वीचा विद्यार्थी प्रद्युम्न सूरज बरडे (१७) याच्या खूनाचे रहस्य मंगळवारी पोलिसांनी उलगडले. त्याचा अल्पवयीन मित्रानेच एका मित्राच्या सहकार्याने प्रद्युमचा गळा आवळून व डोक्यावर दगडाने प्रहार करुन खून केला. या खुनाच्या तपासाला पोलिसांना तब्बल महिनाभराचा कालावधी लागला.या प्रकरणी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतरच जोरदार हालचाली झाल्या. आरोपीचे सूरज जांभुळकर (२०) रा. मायनर्स क्वॉर्टर, नांदगाव नाव असून त्याला दुसऱ्या एक अल्पवयीन वर्गमित्र आरोपीने सहकार्य केले. त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या निर्घृण हत्याकांडाने प्रद्युम्नचे वडील सूरज बरडे अद्यापही दहशती खाली आहेत.प्रद्युम्न मित्रांसोबत १३ एप्रिल रोजी घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सूरज बरडे यांनी मुलाचा शोध सर्वदूर घेतला. त्याच्या मित्राकडे विचारणा केली. त्यानेही उडवाउडवीचे उतरे दिली. दरम्यान, १४ एप्रिल रोजी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात केली. दरम्यान, वडिलाची व आप्तेष्टाची शोध मोहीम सुरुच होती. अशातच वरोरा पोलिस ठाण्यांतर्गत डोंगरगाव (खडी) गावाच्या निर्जनस्थळावरील टेकडीवर प्रद्युम्नचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख वडील सूरज बरडे यांनी पटविली.चंद्रपूर शहर पोलिसांनी २६ एप्रिल रोजी त्याच्या अल्पवयीन वर्गमित्राला व अन्य मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेवून सोडून दिले. त्यानंतर मृत विद्यार्थ्यांचे वडील सूरज बरडे यांनी आपली व्यथा ‘लोकमत’कडे मांडली. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या खुनाच्या तपासात दिरंगाई या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच पोलिसांनी तपासाला गती दिली.याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३६४, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक हेमराज सिं राजपूत, उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक भगत, पोलीस निरीक्षक ताजने व सहायक पोलीस निरीक्षक बोंद्रे करीत आहेत.‘तो’ करीत होता पोलिसांची दिशाभूलप्रद्युमचा वर्गमित्र अल्पवयीन असून खुनाचा मुख्य सूत्रधार आहे. एकाच वर्गात असल्याने व घरी ये-जा असल्याने दोघांच्याही आवडीनिवडी एकमेकांना माहिती होत्या. अशातच घटनेच्या दिवशी गोडीगुलाबीने त्याने प्रद्युमला घराबाहेर पडण्यास भाग पाडले. थंड डोक्याने त्याने खुनाचा कट रचला. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल केली. तो अजूनही करीत आहे. मुलीचे व उसनवारी पैसे आणि कॉपी केल्या प्रकरणी बदनामीचे तो नाटक करीत आहे. प्रद्युमच्या हत्येचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्याचा छडा लावण्याची गरज आहे.असा रचला खुनाचा कटप्रद्युम बरडेचा काटा काढण्याचे निश्चित केल्यावर त्याच्याच दुचाकीवर दोघेही बसले. संगणकाच्या शिकवणीला जातो, असे घरच्यांना सांगितले. परंतु ते प्रद्युमला आधी हडस्तीच्या पुलावर घेऊन गेले. त्यांचा तेथील कट फसला. त्यांनी चंद्रपूरला आणून त्याची दुचाकी अंचलेश्वर गेट परिसरात ठेवून निघून गेले. नंतर निर्जनस्थळी वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (खडी) गावाच्या टेकडीवर नेले. तेथे प्रद्युमचा प्रथम गळा आवळला. मेल्याची खात्री होण्यासाठी डोक्यावर दगडाने प्रहार करुन निर्घृण खून केला. त्याच रात्री एक आरोपी स्वत:च्या घरी न जाता तो एका मित्राकडे रात्रभर झोपला.