चौकशी मागणी : कारवाई करावीभेजगाव : येथे गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून एकाच व्यक्तीकडे परवानाधारक स्वस्त दुकान आहे. दुकानदाराकडून ग्राहक संरक्षण नियमाची सर्रास पायमल्ली होत असून येथील दुकानात गैरप्रकार सुरू आहे. त्यामुळे गरीब जनतेची लूट होत असल्याचा आरोप देवाजी म्याकलवार यांनी केला आहे.येथील स्वस्त धान्य दुकानदार कार्डवरील मालाच्या परिमानानुसार निर्धारीत दराने ग्राहकांना पावत्या देत नाही. दिलेल्या धान्याचे वजन बरोबर होत नाही. अनेकदा एक- दोन किलोची तुट येत असते. त्यामुळे गरीब लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे. आपण बीपीएलधारक असताना सुद्धा धान्य मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वस्त धान्य दुकान सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू असते. परिणामत: लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुकानाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी म्याकलवार यांनी केली आहे. (वार्ताहर)
भेजगावच्या स्वस्त धान्य दुकानात गैरव्यवहार
By admin | Updated: August 26, 2015 00:51 IST