शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिशाली ब्लास्टिंगने हातपंप दोन फूट जमिनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:43 IST

बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाऱ्या वेकोलिच्या गोवरी कोळसा खाण अंतर्गत दररोज होणाºया ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत. अशातच गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शक्तीशाली ब्लास्टिंगमुळे गोवरी येथील शिवाजी हायस्कूल शाळेची बोरवेल दोन फूट जमिनीखाली गेली.

ठळक मुद्देगोवरी येथील घटना : शाळा प्रशासन हादरले, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाऱ्या वेकोलिच्या गोवरी कोळसा खाण अंतर्गत दररोज होणाºया ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत. अशातच गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शक्तीशाली ब्लास्टिंगमुळे गोवरी येथील शिवाजी हायस्कूल शाळेची बोरवेल दोन फूट जमिनीखाली गेली. यामुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून शालेय प्रशासन हादरले आहे.बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाºया गोवरी कोळसा खाणीत दररोज दुपारी ४ वाजताच्या सुमारास शक्तीशाली ब्लास्टिंग केली जाते. ब्लास्टिंगची तीव्रता भयानक असल्याने अल्पावधीतच येथील घरांना तडे गेले आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा वेकोलिकडे तक्रारी केल्या. मात्र वेकोलि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे समस्या अजुनही जैसे-थे आहे.गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या ब्लास्टिंगने शिवाजी हायस्कूल शाळेचे हातपंप चक्क दोन फूट खोल जमिनीखाली दबल्या गेले. शिवाय त्यातून पाणीही बंद झाले. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्लास्टिंगमुळे शाळेच्या इमारतीलाही तडे गेले आहेत. याबाबत आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी सभागृहात प्रश्न मांडला होता. तेव्हा शासनाने चौकशी लावली होती. शाळेच्या इमारतीची पाहणी केली व गावातील नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर काहीच उपाययोजना झाल्या नाही.वेकोलिच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त असून ब्लास्टिंगची तीव्रता वाढविल्याने वारंवार असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ब्लास्टिंगची तीव्रता कमी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी, नागरिकांनी केली आहे.ब्लास्टिंगचा जीवाला धोकावेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लास्टिंगने गावकरी व विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शक्तीशाली ब्लास्टिंगने घरे पडून जीवघेण्या घटना यापूर्वी घडल्या आहे. त्यामुळे आजच्या घटनेने गावकरी व शालेय प्रशासन हादरले आहे.