यामुळे विद्यार्थ्यांचा वीज विभागावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.
डेपो विभागातील एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही याबाबत अनेकदा वीज कार्यालयात फोन करून सांगतो की, आमची ऑनलाईन परीक्षा आहे, वीज बंद करू नका. तरीसुद्धा एका दिवसात अनेकवेळा एका मिनिटासाठी जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने वीज बंद व परत पुन्हा चालू करण्यात येत असते. असे का होते, हे कोणालाच कळत नाही. अनेकदा वीज कर्मचारी फोनच उचलत नाहीत. वीज कर्मचाऱ्यांचे व्हॉट्स-ॲप नंबर केवळ शोभेची वस्तू आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये वीज कार्यालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांप्रति असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.