शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोवनी प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:58 IST

आॅनलाईन लोकमतराजुरा : वेकोलि पोवनी २ व ३ या कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अखेर वेकोलि व्यवस्थापनाने मान्य केल्या आहे. परिणामी, चार महिन्यांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची गुरुवारी सांगता करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, वेकोलिचे कार्यकारी महाव्यवस्थापक बी. ...

ठळक मुद्देचार महिन्यांनी उपोषण सुटले : वेकोलिकडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

आॅनलाईन लोकमतराजुरा : वेकोलि पोवनी २ व ३ या कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अखेर वेकोलि व्यवस्थापनाने मान्य केल्या आहे. परिणामी, चार महिन्यांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची गुरुवारी सांगता करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, वेकोलिचे कार्यकारी महाव्यवस्थापक बी. सी. सिंग, पोवनी कोळसा खाणीचे व्यवस्थापक जी. पुलय्या, वेकोलिचे अधिकारी सी. पी. सिंह, एकम्बरम, रमेश सिह, शेतकरी नेते शेषराव बोंडे, पं.स. सदस्य संजय करमनकर, उत्तम बोबडे, उपसरपंच अमोल घटे आदी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्या व समस्या मांडल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यावर सविस्तर चर्चा केली. आंदोलनामुळे पोवनी कोळसा खाण मागील चार महिन्यांपासून बंद होती. परिणामी, राष्ट्रीय हानी होत असल्याची माहिती वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. शिवाय शेतकऱ्यांची बाजू ऐकून वेकोलि अधिकाºयांनी प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या लगेच मान्य केल्या. प्रकल्पग्रस्तांनी १० आॅक्टोबर २०१७ पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले होते. चार महिने पाच दिवस चाललेल्या आंदोलनामुळे पोवनी कोळसा खाणीचे उत्पादन आंदोलकांनी बंद पाडले होते. दरम्यान, या परिसरात प्रवेशाला निर्बंध घालणारा आदेश जारी करण्यात आला होता. हा मनाई हुकूम मागे घेण्याचे आणि व्यवस्थापनाने दाखल केलेला नुकसान भरपाईचा दावा परत करण्याचे मान्य करण्यात आले. पोवनी दोन व पोवनी तीन प्रकल्प एकाचवेळी सुरू झाले होते. त्यामुळे दोन्ही खाण परिसरातील प्रकल्पग्रस्तांना सारखा न्याय व नुकसानभरपाई देण्याची मागणी वेकोलिने मान्य केली. त्यानुसार प्रकल्पात गेलेल्या शेतीला कोरडवाहू ८ लाख रुपये तर ओलीत जमिनीला १० लाख मोबदला देण्यासाठी कोल इंडियाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.तसेच वाढीव मोबदला देण्याचहीे मान्य करण्यात आले. स्थानिक बेरोजगारांना खाणीत रोजगार मिळावा आणि शेतकरी, प्रकल्पग्रस्तांना वेकोलि क्षेत्रीय कार्यालयात सन्मानाची वागणूक देण्याच्या प्रश्नावरही व्यवस्थापनाने संमती दर्शविली.माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख, तहसीलदार डॉ. होळी, कार्यकारी मुख्य महाव्यवस्थापक सिंग, जी. पुलय्या आदींनी उपोषणकर्त्यांना निंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.