पळसगाव (पि) : चिमुर तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोदेंडा येथे ६१ व्या गुंफा महोत्सवानिमित्त जीवनदर्शन बहुद्देशीय संस्था, चंद्रपुरद्वारा संचालित श्री गुरुदेव व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र, नेरीतर्फे व्यसनमुक्तीवर पोस्टर प्रदर्शन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे प्रकल्प समन्वयक जितेंद्र गाडगे यांनी गुरुदेवांचे विचार आत्मसात करा. रोज पहाटे सकाळी उठून फिरायला जा व व्यायाम करा. व्यसनमुक्त जीवन जगल्याने मानवाच्या बुद्धीचा विकास होतो. आजचा युवक व नागरिक व्यसनाधीन होत चालला आहे. त्यामुळे कोरोनाच नाही तर निसर्ग नियमांचेही पालन गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी चंद्रभान शेंडे, संभाजी वाढई, सुबोध घोनमोडे, कृष्णा वसाके, मीराबाई ढोक, दामोदर दडमल, भोजराज कामडी उपस्थित होते.