शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

महापौरपदासाठी मोर्चेबांधणी जोरात

By admin | Updated: April 25, 2017 00:23 IST

चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. मतमोजणीही झाली. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला.

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. मतमोजणीही झाली. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. ६६ पैकी ३६ जागा जिंकून सत्ता स्थापनेसाठी लागणारा जादुई आकडा भाजपाने मतमोजणीतच पार केला. त्यामुळे भाजपाची सत्ता बसून महापौरही भाजपाचाच बसेल, हे स्पष्टच झाले आहे. असे असले तरी महापौर पदावर कोणाची वर्णी लागेल, याची आता शहरात जोरदार चर्चा केली जात आहे. दुसरीकडे महापौर पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी इच्छुक महिला नगरसेवकांनी वरिष्ठांकडे चांगलीच फिल्डींग लावली आहे. मात्र महापौर पदाचा हा चेंडू दोन्ही स्थानिक मंत्र्यांच्या दरबारात असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कोण महापौर असेल, याचा निर्णय होणार आहे.मनपा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात केवळ ५२ टक्केच मतदान झाले. २१ एप्रिलला जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी झाली. यात भाजपाने प्रारंभीपासूनच आघाडी घेतली होती. ६६ पैकी ३६ उमेदवार निवडून आल्याने भाजपाने सत्ता स्थापनेसाठी होणारा वादविवाद तेथेच संपवून टाकला. मागील पंचवार्षिकमध्ये भाजप नगरसेवकांची संख्या १६ होती. यंदा यात दुपटीने वाढ होत ती संख्या ३६ च्या घरात पोहचली आहे. काँग्रेसची मात्र मोठी घसरण झाली. मागील पंचवार्षिकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उदयास आला होता. तब्बल २६ नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र काँग्रेसला केवळ १२ जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसला हादरा आणि भाजपाची मुसंडी हा केवळ एकच बदल झालेला नाही. यंदा मतदारांनी अनेक विद्यमान नगरसेवकांना पसंदी दर्शविली नाही. विद्यमान नगरसेवकांपैकी यंदाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या तब्बल २५ नगरसेवकांना मतदारांनी कौल दिला नाही. त्यामुळे त्यांना पुढील पाच वर्ष घरीच बसावे लागणार आहे. मोठ्या प्रमाणात विद्यमान नगरसेवकांना मतदारांनी नाकारले असले तरी १७ विद्यमान नगरसेवकांवर जनतेने पुन्हा विश्वास ठेवला आहे. त्यांना या निवडणुकीत निवडून देऊन परत एकदा सभागृहात पाठविले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांना मनपाचे कारभारी म्हणून नेमले आहे. असे तब्बल ४९ नवे चेहरे मनपात नगरसेवक म्हणून दाखल झाले आहे. एवढ्या मोठ्या संख्येत नवीन चेहरे असल्याने महापौर पदासाठीही नवीन चेहरा दिला जाईल की जुन्यापैकीच एकाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडेल, याची मोठ्या चवीने चर्चा केली जात आहे.महापौर पद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे मनपात महिला राज येईल, हे महापौर पदाच्या आरक्षणानंतरच स्पष्ट झाले होते. ओबीसी महिलेसाठी हे पद आरक्षित असल्याने या आरक्षणात निवडून आलेल्या महिला नगरसेवकांनी व त्यांच्या पतीदेवांनी महापौर पदासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. आपल्या नावाची चर्चा आहे की नाही, याबाबत वरिष्ठ नेत्यांचा कौल घेतला जात आहे. वरिष्ठ नेत्यांची मनधरणीही केली जात आहे.असे असले तरी भाजपाच्या नगरसेविका अनुराधा हजारे, छबू वैरागडे, वंदना तिखे आणि संगिता खांडेकर यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. उल्लेखनीय असे की जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनाखालीच महापौर पदाचा दावेदार ठरणार आहे. सध्या हे दोन्ही आपल्या कामात व्यस्त असून जिल्ह्याबाहेर आहेत. ना. मुनगंटीवार आणि ना. अहीर हे चंद्रपूरला आल्यानंतर महापौर पदाच्या उमेदवारांबाबत विचारविनिमय होणार आहे. त्यानंतरच महापौर पदाचा उमेदवार समोर केला जाणार आहे, अशी माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)आज जारी होणार नोटीसमहापौर पदाची निवडणूक घेण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून सभा घेण्यासाठी नोटीस बजावली जाते. त्यानंतर सभा आयोजित केली जाते. ३० एप्रिलला महापौर पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वीच नवा महापौर निवडला जाईल. दरम्यान, सभा बोलविण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडून २५ एप्रिलला पत्र येण्याची शक्यता मनपाचे उपायुक्त विजय देवळीकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. त्यानंतर महापौर पदासाठी इच्छुकांकडून नामांकन दाखल केले जाईल. ३० एप्रिल पूर्वी सभा घेऊन महापौर पदाची निवड केली जाणार आहे.भाजपा नगरसेवकांची बैठकमनपा निवडणुकीत भाजपाचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांच्या विजयानंतरची पहिली बैठक आज सोमवारी रात्री आयोजित करण्यात आली. या बैठकीत सत्ता स्थापने, सत्ता स्थापनेनंतर शहराचा विकास साधण्यासाठी कोणती कामे प्राधान्याने हाती घ्यायची, महापौर पदाची निवडणूक आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. आ. नाना श्यामकुळे यांच्या मार्गदर्शनात ही बैठक होत असून रात्री उशिरापर्यंत ना. हंसराज अहीर हे देखील बैठकीला उपस्थित राहतील, अशी शक्यताही भाजपाच्या नगरसेवकांनी वर्तविली आहे.