आॅनलाईन लोकमतमूल : चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील मूलजवळील उमा नदीच्या पुलावर काही अंतराने खचल्याप्रमाणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चार चाकीसह दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे याच मार्गावरील पुलाजवळ झुडपे वाढल्याने समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.मूल शहरातून जाणाºया चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील पुलाजवळ थोड्या थोड्या अंतरात खच पडली असून त्याचे खड्ड्यात रुपांतर होत आहे. यामुळे येथे मागील काही महिन्यापूर्वी अपघात घडले आहेत.याच मार्गावर पुलासमोरील रस्त्यातील कडेला मोठमोठे झुडपे वाढल्याने समोरुन येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अपघातात होत असल्याने कित्येकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देवून पुलावरील खड्डे व वाढलेले झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
महामार्गावरील पुलावर खड्डे झुडूपांमुळे अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:16 IST
चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील मूलजवळील उमा नदीच्या पुलावर काही अंतराने खचल्याप्रमाणे खड्डे पडले आहेत.
महामार्गावरील पुलावर खड्डे झुडूपांमुळे अपघाताची शक्यता
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : वेळीच लक्ष द्यावे