शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक चर्चेने समाधान वाटले

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

लोकमतने पुणे येथे आयोजित केलेल्या ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या भव्यदिव्यतेने आपण भारावलो.

बाबासाहेब वासाडेंचे अनुभव कथन : एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्रचंद्रपूर : लोकमतने पुणे येथे आयोजित केलेल्या ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या भव्यदिव्यतेने आपण भारावलो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकमतने शैक्षणिक क्षेत्रावर चांगली आणि सकारात्मक चर्चा घडवून आणली. एका शैक्षणिक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून या चर्चेने आपण समाधानी झालो, असे मत कृषी जीवन विकास प्रतिष्ठान येनबोडीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केले. अ‍ॅड.बाबासाहेब वासाडे यांच्या कृषी जीवन विकास प्रतिष्ठानच्या अंतर्गत जिल्ह्यात अनेक शाळा-महाविद्यालय कार्यरत आहेत. ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमाबाबत त्यांना काय वाटले, हे जाणून घेण्यासाठी लोकमतने त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी कार्यक्रमाच्या सादरीकरणाबाबत मनापासून कौतुक केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्यासमक्षच शैक्षणिक क्षेत्रातील समस्या आणि उणिवा मांडण्यात आल्या. त्यामुळे कार्यक्रम परिणामकारक झाला. शासनाने शिक्षकांसाठी सीईटी परीक्षा सक्तीची केली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात इंटरनेट, संगणकांची सुविधा नाही. त्यामुळे होतकरू आणि हुशार मुलांचे नुकसान होत आहे. याबाबत बाबासाहेब वासाडे यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले आणि यात सुधारणा करण्याची मागणी केली. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांनी यात आवश्यक ते बदल केले जाईल, अशी ग्वाही दिल्याचेही वासाडे यांनी सांगितले.होतकरू विद्यार्थ्यांना शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र या शिष्यवृत्ती वाटपात शासनाकडून अनियमितता होत आहे. याबाबीकडेही शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. दोन वर्षांपासून राज्य शासनाने शिष्यवृत्तीचे पैसे दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे या कार्यक्रमात अनेक शैक्षणिक संस्थाचालकांनी सांगितले.सध्याचे शिक्षण चांगले असले तरी आणखी व्यवसाय ओरीएन्टेड शिक्षण असले पाहिजे. तंत्र शिक्षणात बदल होऊन हे शिक्षणच बेरोजगारांना व्यवसायासाठी कामात आले पाहिजे, असे मतही संस्थाचालकांनी यावेळी मांडले. स्किल डेव्हलपमेंटवर आधारित शिक्षण आले पाहिजे, याचा तरुणांना चांगला फायदा होईल. या मुद्यावरही या कार्यक्रमात ताकदीने चर्चा झाली. यावर मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी चांगल्या आणि सकारात्मक बोलल्या. धडपडे आणि प्रचंड कार्यक्षमता असणारे व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाले असल्याने कार्यक्रम प्रभावी झाला. लोकमतने संबंधित खात्याच्या दोन्ही मंत्र्यांसमोर सामूहिकरित्या शैक्षणिक क्षेत्रावर चर्चा घडवून आणल्याने याचा निश्चितच परिणाम होईल, अशी आशा बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केली. लोकमतचे चेअरमन विजय दर्डा हे दिवसभर कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनीही सर्व समस्या ऐकून घेतल्या, याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. (वाणिज्य प्रतिनिधी)