शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हे घ्या पुरावे..! सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवारांकडून पत्रकबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 11:36 IST

एकूणच दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० लाख मंजूर केल्यानंतर या दोन्ही नेत्यांकडून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर दीक्षाभूमीसाठी मंजूर निधीचा श्रेयवाद

चंद्रपूर : येथील पवित्र ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनात आवश्यक बाबींसाठी राज्य शासनाने मंजूर केलेला ५० लाखांचा निधी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच मंजूर झाला, असा दावा माजी अर्थमंत्री आमदारसुधीर मुनगंटीवार व चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. कोणाचा दावा किती खरा, ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

याप्रकरणी आमदार मुनगंटीवार यांनी केलेला पाठपुरावा व निधी मंजूर झाल्याचे पत्र पाठवून हे घ्या पुरावे म्हणत बाॅम्बच टाकला आहे. दुसरीकडे आमदार जोरगेवार यांनी नागपूर दीक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी केल्याचा दावा केला. इतकेच नव्हे, तर अधिवेशनात सातत्याने मागणी लावून धरल्यामुळेच दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत दोन कोटी रुपये मंजूर झाल्याचा दावा केला होता. यातील ५० लाख दीक्षाभूमीच्या विकासासाठी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

उल्लेखनीय म्हणजे, आमदार जोरगेवार यांनी दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा. सोबतच संविधान भवन आणि आदिवासी समाजासाठी आदिवासी भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्याचे प्रसिद्धीपत्रकही काढले होते. एकूणच दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० लाख मंजूर केल्यानंतर या दोन्ही नेत्यांकडून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे.

आमदार मुनगंटीवार यांनी आपला दावा खरा आहे, हे सांगण्यासाठी केलेला पत्रव्यवहार आणि त्यावर ५० लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांच्या नावाने प्राप्त पत्रच पुरावा म्हणून वृत्तपत्रांकडे पाठविला आहे. तर, आमदार जोरगेवार यांनी मुंडे यांना पाठविलेल्या पत्राची प्रत पाठविली आहे. मात्र, त्यांच्या पत्राच्या आधारे निधी मंजूर झाल्याचे त्यांच्या पत्रावरून दिसून येत नाही. 

टॅग्स :PoliticsराजकारणSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMLAआमदार