शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांचे फलक, बॅनर हटवा!

By admin | Updated: January 13, 2017 00:29 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीची घोषणा होताच प्रशासन सज्ज झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची वाहने काढाचंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीची घोषणा होताच प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि पंचायत समितीचे सभापती आदी पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्याचे आदेश दिले. तसेच जिल्ह्याभरात लावण्यात आलेले राजकीय नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे फ्लेक्स काढण्याचे निर्देशही यावेळी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या संदर्भात सूचना देण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी सलील यांनी गुरूवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संपूर्ण निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, आचारसंहिता लागू झाली असल्याने सरकारी वाहने काढण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले, उपाध्यक्ष कल्पना बोरकर आणि विषय समित्यांचे सर्व सभापती यांना शासकीय वाहने देण्यात आली होती. बुधवारी आचारसंहिता लागू होताच त्यांनी आपल्या ताब्यातील शासकीय वाहने जमा केली आहेत. त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने जमा करून आपल्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागणार आहे. सलील यांनी निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याबाबत सजग राहण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागात मंत्री, राजकीय नेते, कार्यकर्ते आदींच्या वाढदिवसांचे आणि अभिनंदन करणारे फलक लागलेले आहेत. ते सर्व राजकीय फलक काढण्याबाबतही सलील यांनी निर्देश दिले. राजकीय नेत्यांचे फलक काढून निवडणूक निष्पक्ष होण्यासाठी मदत करावीढ़ असेही त्यांनी यावेळी सांगितले.या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, निवडणूक उपजिल्हाधिकारी चिखले यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)१५ पथकांचे गठन करणारजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याकरिता १५ तालुक्यात तालुकास्तरावर निवडणूक पथकांचे गठन केले जाणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, त्याची छाननी करणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित करणे, चिन्ह वाटप करणे आदी सर्व प्रक्रिया तालुका पातळीवर पार पाडली जाणार आहे. त्याकरिता निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदारांच्या नेतृत्त्वात कार्यवाही केली जाणार आहे. तहसीलदारांचे पथक सर्व निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहे.