शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

बल्लारपूरचे पोलीस ठाणे मॉडेल बनविणार

By admin | Updated: January 31, 2015 23:17 IST

मुंबईतील घाटकोपर आणि सहारच्या धर्तीवर चंद्रपुरातील बल्लारपूर पोलीस स्टेशन अत्याधुनिक करण्याचा जिल्हा पोलिसांचा मानस आहे. हे पोलीस स्टेशन मॉडेल ठरणार असून त्या दृष्टीने

चंद्रपूर: मुंबईतील घाटकोपर आणि सहारच्या धर्तीवर चंद्रपुरातील बल्लारपूर पोलीस स्टेशन अत्याधुनिक करण्याचा जिल्हा पोलिसांचा मानस आहे. हे पोलीस स्टेशन मॉडेल ठरणार असून त्या दृष्टीने गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.चंद्रपूर उपविभागातील पाचही पोलीस ठाण्यांना अलिकडेच आयएसओ मानांकन मिळाले आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांनी अन्य प्रश्नांच्या उत्तरात ही माहिती दिली.यावेळी उपविभागीय पोलीस उप अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस अधिक्षक म्हणाले, बल्लारपूर शहर ठाण्याच्या हद्दीत जागा मोठी असल्याने आणि तेथील कामाचा व्याप मोठा असल्याने हा निर्णय घेतला आहे. मॉडेल ठाणे बनविण्यासाठी नकाशा, डिझाईन तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या इमारती नव्याने बांधण्यासाठी गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव गेले आहेत. दुर्गापूर पोलीस ठाणे सीटीपीएसच्या इमारतीमध्ये आहे. ती इमारत जुनी आहे. त्यामुळे या नव्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. या सोबतच चिमूर पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी प्रस्ताव गेला आहे. भद्रावती पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामासाठी निधी आला आहे. सावली, माजरी येथील पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम सुरु झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती अद्ययावत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण विभागाकडून चंद्रपुरातील २०० क्वॉर्टर आणि भद्रावतीमधील ७५ क्वॉर्टर उभारण्यासाठी निधी आल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला पोलीस निरीक्षक गीरी, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर, घुग्घुसचे ठाणेदार मनिष ठाकरे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)