शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

सीमेवर उभारलेली पोलीस चौकी गायब !

By admin | Updated: April 29, 2016 01:11 IST

शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करुन एक वर्षाचा कालावधी लोटला. परंतु दारु विक्रेते व तस्करांना आळा घालण्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांना यश आले नाही.

दारु तस्करांना रस्ता मोकळा : तेलंगणातील दारु परवानाधारक मालामालराजुरा : शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करुन एक वर्षाचा कालावधी लोटला. परंतु दारु विक्रेते व तस्करांना आळा घालण्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांना यश आले नाही. अवैधरित्या दारू विकली जात असून दारु व्यवसाय जोमात सुरू आहे. सीमेवरील पोलीस चौकीही गायब झाल्यामुळे तेलंगणा राज्यातील सीमेवरील परवानाधारकांना याचा मोठा प्रमाणात फायदा होत आहे. तेलगंणाची दारु व महाराष्ट्राचा पैसा असा खेळ राजुरा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती तालुक्यात सुरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीची घोषणा झाली. निर्णयही झाला. तरीही दारुबंदी जिल्ह्यात दारुचा महापूर वाहत आहे. दारुबंदीपूर्वीॅ परवानाधारक मालामाल झाले होते. त्यामुळे त्यांनी दारुबंदी हटविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु त्यात यशस्वी झाले नाही. परवानाधारक ३००- ४०० दुकानदार दारु विक्री करीत होते. दारुबंदीनंतर अवैध दारु विक्री करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या संख्येत असून अल्पशा कालावधीत मोठी रक्कम मिळ्ण्याचे साधन बनले आहे. ४० रुपयांची देशी दारुची बॉटल १२० ते १५० रुपयात विक्री सुरू आहे. तेलंगणातील ६० रुपयाची बॉटल १५० रुपयात व विदेशी दारुची ११० रुपयाची बॉटल २५० रुपयात विक्री करून कमाई केली जात आहे. पोलीससुध्दा चिरमिरी घेऊन बाजुला होत आहे. त्यामुळे दारु विक्रीचा धंदा सर्वत्र जोमात सुरू आहे. त्यांना कोणाचीही भीती नाही. दारु पिणाऱ्याची संख्या वाढली आहे. परंतु दारु पिण्याचा डोज कमी झाल्यामुळे झगडे तंटेचे प्रमाण कमी झाले आहे.तेलंगणातील वाकडी, बेला, आसिफाबाद, काजगनगर, सिरपूर, मंचेरीयल, बेलमपल्ली येथील परवानाधारक दुकानदाराकडून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिंपरी, बल्लारपूर तालुक्यात दारुची आयात करुन सर्रास विक्री सुरू आहे. जंगल शेजारी व आड मार्गावर पोलिसांची गस्ती नसते. त्यामुळे विक्रेत्यांचे फावत असून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेची रक्कम व तेलंगणाची दारु असा प्रकार सर्रास सुरू आहे. तेलंगणातील परवानाधारक दुकानामधील दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज लाखो रुपयाची दारु सीमेजवळील तालुक्यात बिनधास्त येत आहे व त्याची विक्री चौकात किंवा घरपोच सेवा सुरू आहे. यावर आळा घालणे पोलिसांना सहज शक्य आहे. परंतु त्यांचीही मानसिकता आता बदलल्याचे दिसून येत आहे.सीमेवरील पोलीस चौकी गायब झाली आहे. पोलिसांचा तंबू निघाला आहे. त्यामुळे तस्करांना राज्य मार्गाने बिनधास्त दारुची आयात करता येत आहे. यात सहजपणे दररोज हजारोची कमाई होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात युवक गुंतले आहेत. (तालुका प्रतिनिधी)