शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

पोलिसांचे काम आरोपींमध्ये धाक कायम राहील असे हवे

By admin | Updated: October 13, 2016 02:19 IST

आरोपींवरील दोष सिध्दीचे प्रमाण पूर्वी केवळ १० टक्के होते. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण ५१ टक्यांवर पोहोचले आहे.

सुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर पोलीस ठाणे इमारतीचे भूमिपूजनचंद्रपूर : आरोपींवरील दोष सिध्दीचे प्रमाण पूर्वी केवळ १० टक्के होते. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण ५१ टक्यांवर पोहोचले आहे. एकही आरोपी निर्दोष सुटता कामा नये, यादृष्टीने दोष सिध्दीसाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. न्यायव्यवस्था तसेच पोलिसांबद्दल आरोपींमध्ये धाक बसण्यासाठी हे प्रमाण वाढणे आवश्यक असून पोलिस विभागाबद्दल सज्जनांना मैत्री व दुर्जनांना भीती वाटेल, असे काम पोलिस विभागाचे असावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथे १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या पोलीस ठाणे व २४ निवासस्थानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय धोटे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, नगराध्यक्ष छाया मडावी, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपअधीक्षक जयचंद काठे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, राजेंद्र मालपाणी आदी उपस्थित होते.बल्लापूर येथे नव्याने होत असलेली इमारत केवळ विटा, सिमेंट, मातीची असू नये तर सामान्यांना चांगली सेवा देणारी तसेच वाईट प्रवृत्तींना आळा घालणारी असावी, पोलीस विभागास अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांना चांगली निवासस्थाने देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. चंद्रपूर येथे १०२ कोटी रुपये खर्च करून पोलिसांची चांगली वसाहत निर्माण होत आहे. जिल्ह्यात दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर झाली असून दुगार्पुर पोलीस स्टेशनच्या इमारतीची प्रशासकीय मान्यता झाली आहे. चंद्रपूर येथे पोलिसांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा बांधली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाणी यांनी प्रास्ताविक केले. संचालन पोलीस अधिकारी विकास मुंढे यांनी तर आभार बल्लारपूरचे ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)ही कामे प्रस्तावित बसस्थानकाचे नुतनीकरण, उपविभागीय कार्यालयाचे बांधकाम, स्टेडीयम, बॅटनिकल गार्डन ही कामे बल्लारपुरात होऊ घातली आहेत. शहरातील शाळा अत्याधुनिक होणार असून टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रोजगाराचा आराखडा तयार केला जात आहे. नाट्यगृहही लवकरच होणार आहे. या शहराच्या सर्वांगिण विकासाठी आपला नेहमीच पुढाकार राहणार असल्याचे ते म्हणाले.