शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सावरगावच्या पोलीस पाटलाकडून माजी सैनिकाच्या कुटुंबाला मनस्ताप

By admin | Updated: September 27, 2014 23:13 IST

येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील पोलीस पाटील रवींद्र बोरकर हे माजी सैनिक प्रकाश मांढरे यांच्या घराजवळच राहत असून त्यांची शेतीला शेती लागून आहे. शेतीविषयक अनेक

तळोधी (बा.) : येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील पोलीस पाटील रवींद्र बोरकर हे माजी सैनिक प्रकाश मांढरे यांच्या घराजवळच राहत असून त्यांची शेतीला शेती लागून आहे. शेतीविषयक अनेक बाबतीत बोरकर हे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप तळोधी (बा.) येथे आयोजित पत्रकापरिषदेत माजी सैनिक प्रकाश मांढरे यांनी केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना मांढरे म्हणाले, नागभीड तहसील कार्यालयात रवींद्र बोरकर यांनी केलेल्या अर्र्जानुसार त्यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या गट क्र. ४८७ मध्ये एक बोअरवेल आहे. मात्र नागभीड तहसीलदारांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी वाय.एच. चांदेकर यांनी केलेल्या मोका पंचनाम्यानुसार सदर बोअरवेल गट क्रमांक ४५३ व गट क्रमांक ४५२ या दोन्ही शेताच्या मधोमध आहे. मात्र निश्चित ठिकाण ते दर्शवू शकले नाहीत. त्याचप्रमाणे मांढरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४९० च्या शेतात चिकूची बाग असून बागेत मागील आठ-नऊ वर्षांपासून ४०-४५ चिकूची झाडे आहेत. सदर चिकूच्या बागेतून बोरकर यांनी पाईपलाईन टाकली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.परंतु मांढरे यांच्या म्हणण्यानुसार, पाईप लाईन केव्हा टाकली व विनापरवानगीने माझ्या शेतातून कशी टाकली, हे न उलगडणारे कोडेच आहे. प्रकाश मांढरे यांनी सावरगाव येथील तलाठी कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता, सदर प्रकरणी ५ मार्च २०१४ रोजी नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी मोका चौकशी केली असून त्यानुसार मोक्यावर असलेल्या बोअरवेल व पाईपलाईनची काल्पनिक स्थिती नकाशात दर्शविली आहेत. परंतु बोअरवेल व पाईपलार्इंची नोंद मूळ नकाशात केली जात नाही किंवा तसा आदेश नसल्याचे तलाठी यांनी लेखी स्वरुपात कळविले आहे.मांढरे यांचे म्हणण्यानुसार, रविंद्र बोरकर यांच्या गट क्र. ४५२ या शेताची आराजी ३० आर आहे. यातील काही जमीन घर बांधकामासाठी तिघांना विकली असून स्वत:चे घरही त्यांनी याच जागेवर बांधले आहे. तरीपण ९ डिसेंबर २००९ ला भूमापन अधिकाऱ्यांनी केलेल्या मोजणीनुसार जमिनीचे क्षेत्रफळ ३० आर ऐवजी ३३ आर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बोरकर यांची जमिन कमी होण्याऐवजी वाढण्याचा चमत्कार घडला.(वार्ताहर)