लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा.) : तळोधी (बा.) ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर भाजीपालाधारकानी गुजरी भरवून अतिक्रमण करीत असल्यामुळे नागरिकांना रहदारी करताना अडचणी येत होत्या. मात्र भाजीपाला विक्रेते मुजोरी करीत हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांच्या बंदोबस्तात ग्रामपंचायतने रस्त्यावरील अतिक्रमण हटविले.तळोधी (बा) ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर गेल्या सहा ते सात महिन्यांपासून भाजीपाला व लहान-मोठे व्यवसाय धारकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुला आपले व्यवसाय थाटले होते. त्यामुळे या मार्गावरून नेहमी रहदारी करीत असताना वाहनधारकांना अडचणी निर्माण होत होत्या. ग्रामपंचायतीने अनेकदा नोटीस बजावून सुद्धा भाजीपाला धारकांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे सरपंच राजू रामटेके यांनी पोलीस विभागाकडे धाव घेवून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. मंगळवारी पोलीस बंदोबस्तात मुख्य रस्त्यावरील व बसस्थानकाजवळील दोन्ही बाजुला फळविक्रेते, चायटपरी यांचे वाढलेले अतिक्रमण ठाणेदार श्रीकांत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाºयांनी हटविले. यावेळी सरपंच राजू रामटेके, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तळोधी ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:13 IST
तळोधी (बा.) ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर भाजीपालाधारकानी गुजरी भरवून अतिक्रमण करीत असल्यामुळे नागरिकांना रहदारी करताना अडचणी येत होत्या.
तळोधी ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण
ठळक मुद्देग्रामपंचायतने रस्त्यावरील अतिक्रमण हटविले.