शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

५६ ठिकाणी पोलिसांची कडेकोट नाकेबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधताना लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये सध्या आहे. मात्र गावागावांमध्ये आशा वर्करकडून येणाऱ्या आकडेवाडीरीमधून, महानगरपालिका व पोलिसांकडून येणाºया आकडेवारीतून अनेकजण चंद्रपूरमध्ये हे नव्याने दाखल होत असल्याचे दिसून येते. यापुढे शासकीय कर्मचाऱ्यांसह अन्य कोणालाही अपडाऊनची परवानगी नाही.

ठळक मुद्देपुढील १८ दिवस महत्त्वाचे : ग्रामसुरक्षा दल व नागरिकांनी गावे सील करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. चंद्रपूर जिल्हा देशभरात ग्रीन झोनमध्ये आला आहे. मात्र अद्यापही धोका टळला नसून आरोग्य विभाग प्रत्येक नागरिकांची तपासणी करीत आहे. सोबतच नवीन येणाऱ्या प्रत्येकाला तपासणी करूनच आतमध्ये घेतले जात आहे. जिल्ह्याच्या प्रमुख ५६ ठिकाणांवर पोलिसांचा २४ तास जागता पहारा आहे. यापुढे चंद्रपूरमध्ये कोणी येऊ नये व चंद्रपूरमधून कोणीही बाहेर जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश बुधवारी जिल्हा प्रशासनाने दिले आहे.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधताना लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये सध्या आहे. मात्र गावागावांमध्ये आशा वर्करकडून येणाऱ्या आकडेवाडीरीमधून, महानगरपालिका व पोलिसांकडून येणाºया आकडेवारीतून अनेकजण चंद्रपूरमध्ये हे नव्याने दाखल होत असल्याचे दिसून येते. यापुढे शासकीय कर्मचाऱ्यांसह अन्य कोणालाही अपडाऊनची परवानगी नाही. चंद्रपूरमध्ये कोणालाही येता येणार नाही व कोणालाही बाहेर पडता येणार नाही. अपवादात्मक स्थितीमध्ये पोलिसांची परवानगी घेऊनच शहरात तपासणीअंती दाखल होता येईल. प्रत्येकाची तपासणी आवश्यक आहे. नव्याने येणाºया आजारी व्यक्तीला क्वारंटाइन करण्याची थेट कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. प्रत्येक नाक्यावर काळजी घेणे आवश्यक असून जिल्ह्याच्या प्रमुख ५६ ठिकाणांवर पोलिसांचा २४ तास जागता पहारा आहे. मात्र अशावेळी सीमावर्ती गावांमधील नागरिकांनी प्रशासनाचे कान व डोळे होणे आवश्यक आहे. राजुरा उपविभागीय अधिकाºयांनी या संदर्भात अतिशय कडक कारवाई केली असून लगतच्या तेलंगनामधून येणाऱ्या नागरिकांना मज्जाव केला आहे. काहींना काल सीमेवरून परत पाठविण्यात आले आहे. यापुढेही पोलिसांची परवानगी असेल तरच आतमध्ये घेतल्या जाईल. या जिल्ह्यात असणाºया सर्व बाहेरच्या नागरिकांची आम्ही काळजी घेत आहोत. त्याप्रमाणे सीमेलगतच्या असिफाबाद, आदिलाबाद, यवतमाळ, नागपूर याठिकाणी अडकलेल्याचीदेखील काळजी तेथे घेतली जात आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत कोणीही येण्याची व आतून बाहेर जाण्याची हिम्मत करू नये, असे स्पष्ट केले आहे.बँकेत गर्दी करू नकाजिल्ह्यातील सर्व बँका सुरळीत सुरू असून नागरिकांनी आपल्या गावातील सेतू केंद्रांमध्ये बँकेचे व्यवहार आधार कार्ड दाखवून करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. डीजीपे सुविधाद्वारे सेतू केंद्रातून व पोस्ट कार्यालयातूनदेखील बँकेचे व्यवहार नागरिकांना यापुढे करता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाणे गरजेचे नसून सर्व बँकादेखील सुरु ठेवण्यात आलेल्या आहे.चंद्रपुरात अनेक छोटे रस्ते बंदचंद्रपूर शहरांमध्ये अतिशय उत्तम अशी नाकेबंदी आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शहरातील अनेक छोटे रस्ते बंद करण्यात आले आहे. ही नागरिकांची गैरसोय नसून कोरोनासारख्या महामारीसोबत लढण्यासाठी उचलण्यात आलेले सक्त पावले आहेत. शहरात मोठया प्रमाणात निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. येणाºया भाजीपाल्याचे ट्रकसुद्धा निर्जंतुकीकरण करूनच शहरात घेण्यात येत आहे.कुंभार समाजाला परवानगीपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार कुंभार समाजाला त्यांची नियमित पारंपारिक कामे करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील पशुखाद्य विक्री केंद्र उघडण्याचेदेखील निर्देश देण्यात आले आहे.

शेतीच्या कामांना बंधने नाहीशेतीच्या नियमित कामाला कोणतेही बंधन टाकण्यात आले नाही. जीवनावश्यक वस्तू दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत कायम उघडे असतील. २० तारखेनंतर रेशन दुकानांमधून किराणा वाटपालादेखील सुरुवात होणार आहे. सध्या रेशन दुकानातून दोन व तीन रुपये दराने गहू व तांदूळ मिळत आहेत. याशिवाय दरमानसी पाच किलो तांदूळ मोफत मिळत आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

नव्या ५० पैकी ३९ नमुने निगेटिव्हजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ६७ नागरिकांची नोंद करण्यात आली. ५० स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३९ नमुनेही निगेटिव्ह निघाले आहेत. २० नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या २७ हजार ६६२ आहे. यापैकी दोन हजार ८५९ नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांच्या होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २४ हजार ८०३ आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ४९ आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या