शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

 हुबेहूब काजूसारख्या दिसणाऱ्या बिया खाल्याने सोळा मुलामुलींना विषबाधा; भंडारा जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 22:37 IST

Chandrapur News आंधळगाव जवळील शिवणी (चिंचोली) येथील लहान मुलांनी खेळत असतांना चंद्रज्योती झाडाच्या बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्दे-ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

संजय मतेचंद्रपूर:-तालुक्यातीलआंधळगाव जवळील शिवणी (चिंचोली) येथील लहान मुलांनी खेळत असतांना चंद्रज्योती झाडाच्या बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. ह्या सर्व सोळा अल्पवयीन मुलांवर  ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे उपचार सुरू असून एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे उपचार करणारे डॉ. गोधुळे यांनी सांगितले आहे. 

 विषबाधा झालेल्या मध्ये नाहेन सुभाष हटवार(4), कार्तिक माणिक हटवार(7), नैतिक रवी मेहर(13), अंश सुनील ढोणे(7), रुद्र राकेश भोयर(7), वेदांत राकेश भोयर(3), उल्हास उदाराम  थोटे(12), उत्कर्स उदाराम थोटे(8), अथर्व विनोद भोयर(13), विहान अजय पुन्हेवान(7), विपलव अजय पुन्हेवान(6), कु अक्षया प्रवीण मेहर(9), आयुष्या प्रवीण मेहर(6), नितीन रवी मेहर(9), सागर सुभाष बपोरे(10), प्राची महेश बपोरे(6) यांचा समावेश आहे. यातील अक्षया प्रवीण मेहर(9) हिची प्रकृती गंभीर आहे.

 गावातील ही सगळी मुले दुपारी खेळत असताना हटवार यांचे दुकानामागे असलेल्या चंद्रज्योती झाडाच्या फळातील बिया खाल्या. काही वेळातच मुलांना उलट्या सुरू झाल्या एकावेळीच बहुसंख्य मुलांना उलटयाचा त्रास सुरू झाल्याने प्रथम 12 मुला मुलींना आंधळगाव खाजगी रुग्णालय व नंतर ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे भरती करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप गोंधुळे उपचार करत आहेत.

या मुलांनी  चंद्रज्योती झाडाच्या बिया खाल्याने विषबाधा झाली असून त्यांना उलट्या होणाच्या त्रास सुरू आहे. विषबाधेचे सौम्य लक्षण असले तरी अक्षया प्रवीण मेहर (9) हिला जास्त प्रमाणात विषबाधा झाली असून परिस्थिती आटोक्यात आहे.डॉ प्रताप गोंधुळे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय मोहाडी

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा