भारिप-बंमस : मनपा आयुक्तांना निवेदनचंद्रपूर: वॉर्ड क्र. १ मधील विविध वस्त्यांमध्ये रस्ते, नाली, गटारांची समस्या कायम आहे. त्याबाबत भापिर बमस महिला आघाडीने मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.चंद्रपूर शहरातील सुगतनगर, शेंडे लेआऊट, प्राध्यापक कॉलनी, बुद्ध नगर वसाहत, सुंदरनगर, स्वावलंबीनगर, नगीनाबाग वॉर्ड नं.१ मध्ये वसाहतीमध्ये अनेक वर्षापासून नागरी राहत असून त्यांना आवश्यक मुलभूत सुविधा जसे नाल्या, रस्ते व पिण्याच्या पाणी आदी महानगरपालिका झाल्यानंतर पूर्ण होतील अशी अपेक्षा येथील राहणाऱ्या नागरिकांना वाटत होते. परंतु अनेकांना घरासमोरील नाल्या अनेक महिने साफ होत नाही. पिण्याचे पाणी सुद्धा अवेळी व कमी प्रमाणात मिळते. काही भागातील रस्ती काँक्रीटचे झाले आहे. परंतु सुगत नगर, शेंडे लेआऊट, प्राध्यापक कॉलनी, बुद्धनगर वसाहत, सुंदरनगर, स्वावलंबीनगर या भागगातील रस्ते व नाल्याची समस्या तशीच आहे. त्यामुळे लवकरात लवकर या भागातील रस्ते व नाल्यास सुद्धा त्वरीत काँक्रीटचे बनविण्यात यावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. या भागातील नगरसेवकांना वारंवार सांगूनही या अगोदरपासून महानगरपालिका निवेदन दिल्यानंतरही या भागाकडे दुर्लक्ष करीतअ ाहेत.भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीतर्फे वरील समस्यांना घेवून त्या समस्यांचे निवारण करुन मिळण्याकरिता एक निवेदन आयुक्त व मनपा स्थायी समिती सभापती, यांना देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने भारिप लता साव, कल्पना अलोने, तनुजा रायपुरे, शशीकला नवाडे, विद्या टेंबरे, सुजाता कांबळे, फूला धोटे, पुष्पा ठमके, शोभा वाघमारे, कल्पना भसारकर, विश्रांती डांगे, विभा पाटील, दमयंती तेलंग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पाणी, रस्त्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधले
By admin | Updated: August 29, 2016 01:30 IST