शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आमचे आता आधी पूनर्वसन करा हो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

दुसरीकडे तालुक्यातील बेलगाव (जानी) येथील ग्रामस्थांनी आम्हाला ताबडतोब घरकूल देऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी गावाचे दृश्य पाहून केली आहे. एवढा मोठा पूर सत्तरीच्या आयुष्यात कधीच बघितला नाही. आमच्या लहान लहान मुलांनी महापूर बघितल्यानंतर भीतीने घाबरून केविलवाने रडू लागल्याने आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आम्ही जिवंत राहू किंवा नाही, याची काही शाश्वती नव्हती.

ठळक मुद्देवारंवार उद्ध्वस्त होणे झालो असह्य, पूरग्रस्त लाडजवासीयांचा टाहो

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : आतापर्यंत या भागातील सर्वात मोठा पूर आम्ही या डोळ्याने अनुभवला आहे. आता पुन्हा असा तांडव आम्हाला पहायचा नाही, वारंवार उद्ध्वस्त होणे आता असह्य झाले आहे. सुखरूप जीवन जगता येईल, यासाठी आमचे आधी पुनर्वसन करा, मगच आम्ही ब्रम्हपुरी सोडू, अशी मागणी लाडज ग्रामवासीयांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली आहे. स्थानिक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पूरपीडितांनी आपल्या व्यथांची श्रृंखलाच यावेळी व्यक्त केली.दुसरीकडे तालुक्यातील बेलगाव (जानी) येथील ग्रामस्थांनी आम्हाला ताबडतोब घरकूल देऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी गावाचे दृश्य पाहून केली आहे. एवढा मोठा पूर सत्तरीच्या आयुष्यात कधीच बघितला नाही. आमच्या लहान लहान मुलांनी महापूर बघितल्यानंतर भीतीने घाबरून केविलवाने रडू लागल्याने आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आम्ही जिवंत राहू किंवा नाही, याची काही शाश्वती नव्हती. परंतु राष्ट्रीय आपत्कालीन व राज्य आपत्कालीन पथकांच्या जवानांनी आम्हाला जीवनदान दिले आहे. पुन्हा आम्हाला असे दिवस पाहण्याची वेळ येऊ नये, यासाठी आमचे पहिले पुनर्वसन करा, मगच आम्ही ब्रम्हपुरी सोडणार, अशी इशारावजा विनंती लाडजवासीयांनी केली आहे. घरे गेली, पीक गेले. आता आमच्या जवळ काहीही शिल्लक राहिले नाही. परंतु आम्ही सुरक्षित आहोत, हे आमच्या साठी मोठे आहे. गावात चार ते पाच फूट गाळ आहे. १७०० लोकवस्तीच्या गावात गायी म्हशी साठी १० ते १२ लोक आहेत. बाकी सर्वच ब्रम्हपुरीत आले आहेत. आता गावात जाण्याची हिंमत होत नाही, त्यासाठी आमचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. नाही तर आम्ही ब्रम्हपुरी सोडणार नाही, असा टाहो जमलेल्या ग्रामस्थांनी डोळ्यात अश्रू आणून केला. बेलगाव (जाणी) येथील ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी राहण्यासाठी आधी आम्हाला घरकूल द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त पूरग्रस्त गावाना आर्थिक मदत, घरकूल व शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे किमान वर्षभर तरी मोफत धान्य व अनुदान देण्याची मागणी अन्य ग्रामस्थांनी केली आहे.लाडजच्या संपूर्ण गाववासीयांची एकच मागणी आहे की आमचे पुनर्वसन करा. जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही ब्रम्हपुरी सोडणार नाही.-अमोल रामकृष्ण मोहुर्ले,गावकरी, लाडज

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर