शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूरचे क्रीडांगण विदर्भात अद्यावत ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:19 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मुंबई येथील स्मारक साकारणारे शिल्पकार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम केले जाणार आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : २७ कोटींच्या क्रीडा संकुलाच्या बांधकामाला प्रारंभ

आॅनलाईन लोकमतविसापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मुंबई येथील स्मारक साकारणारे शिल्पकार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या भागातील क्रीडापटूंना द्रोणाचार्याशिवाय यश संपादन करण्याची संधी क्रीडांगणाच्या माध्यमातून मिळणार आहे. यामुळे बल्लारपूरचे क्रीडांगण विदर्भात नावलौकिक मिळवणार असून अद्यावत ठरणार, असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केला.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वीज कंपनीच्या वसाहतीलगत १५ एकर जागेत क्रीडा संकूल बांधकामाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना श्यामकुळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे, बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, विसापूर येथील सरपंच रिता जिलटे, रेणुका दुधे, नागपूर क्रीडा विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, तहसीलदार विलास अहीर, राणी द्विवेदी आदींची उपस्थिती होती.ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, या क्रीडा संकुलाचा उपयोग जवळच होऊ घातलेल्या सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे. याला लागून वनस्पती उद्यान पूर्णत्वास जात आहे. सर्वांना शिक्षण, रोजगार, आरोग्य व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आपला प्रयत्न राहणार आहे. बल्लारपूर शहरातील नागरिकांना पंतप्रधान घरकूल योजनेतून घरे मिळावी, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये यश येण्याची खात्री आहे. योगगुरु रामदेवबाबा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित मूल येथे शेतकरी मेळावा घेणार असल्याचे सांगून बल्लारपूर शहराला स्मार्ट करून भारताच्या नकाशावर अग्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. यावेळी हरीश शर्मा यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अधिक्षक अभियंता डी. के. बालपांडे यांनी केले, तर संचालन लोचन वानखेडे यांनी केले.नावलौकिक मिळविणाऱ्या क्रीडापटूंचा सत्कारबल्लारपूर तालुका क्रीडा संकूल २७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे. या बांधकामाचा शुभारंभ करताना बल्लारपूर शहराचा नावलौकिक वाढविणाऱ्या क्रीडापटूंच्या हस्ते मंत्रोपचारात भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सुनील मांझी, आलोक पाल, संजय पारधी, रूखसार बानो, रमेश नातरंगी, कशीश कोडापे, अनुप पोतलवार, ललिता मिसार, मनोज झाडे, विनोद शहा यांचा स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ व क्रीडा पोशाख प्रदान करून ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या मिळणार सुविधाबल्लारपूर तालुक्यात विसापूर हद्दीत साकारणाऱ्या तालुका क्रीडा संकुलात दोन लॉन टेनिसकोर्ट, दोन कबड्डी मैदान, खो-खो क्रीडांगण, बॉस्केट बॉल, व्हॉलीबॉल, जलतरण तलाव, धनुर्विद्या केंद्र व ४०० मीटर सिंथेटिक धावपट्टी तयार करण्यात येत आहे. सभोवताल संरक्षण भिंत, सुरक्षा खोली व प्रवेशद्वार, बॅडमिंटन हॉल, पॅव्हेलियन कक्ष, ५० मुलांच्या क्षमतेचे अद्यावत वसतिगृह, पोशाख बदलण्यासाठी खोली बांधकाम १५ एकर जागेच्या परिसरात केले जाणार आहे.