विदर्भात पहिलाच प्रयोग : मक्तेदारी मोडीत काढण्यास उपयुक्तचंद्रपूर : कॅन्सर, टी.बी., चिकनगुनिया आदी दुर्धर आजारांवर गुणकारी औषधी लक्ष्मीतारूची लागवड चंद्रपूर येथे एका व्यक्तीने केली आहे. केरळमधून आणलेले बी घराच्या छतावर लावण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत ही झाडे उगवली आहेत. चंद्रपूर शहरात १०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.आयुर्वेद शास्त्रात महत्त्व असलेल्या अनेक औषधी झाडांवर काही कंपन्यांनी मक्तदारी निर्माण झाली आहे. ती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी काही संस्था प्रयत्न करीत आहेत. श्रीश्री रविशंकर यांच्या केरळमधील आश्रमात लक्ष्मीतारू या गुणकारी वनस्पतीची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, त्याची लागवड विदर्भात केली जात नाही. चंद्रपूर येथील सचिन चौधरी यांनी केरळ येथील आश्रमातून तीन महिन्यांपूर्वी आणलेल्या बियांची लागवड संजिवनी पर्यावरण संस्थेचे राजेश बेले यांच्या घराच्या टेरेसवर करण्यात आलेली आहे.लक्ष्मीतारूच्या २०० बिया केरळमधून आणण्यात आल्या होत्या. त्यापैकी १०० बियांची लागवड करण्यात आली. मात्र, त्यातून झाडे उगवली नाहीत. त्यानंतर पुन्हा १०० बियांची लागवड करताना गांडूळ खत, वेगळी माती आदीचा वापर करण्यात आला. सेंद्रीय द्रव्यामुळे १०० बियांपैकी ३५ झाडे उगवली आहेत. त्याची रोपे मोठी झाली आहेत. त्यामुळे उत्साह वाढून आणखी २०० बिया केरळमधून आणण्यात येणार आहेत. त्यांचीही लागवड करून १०० झाडे तयार करायची आहेत. चंद्रपूर शहर सर्वाधिक प्रदूषणयुक्त आहे. त्यामुळे लक्ष्मीतारूची १०० झाडे चंद्रपूर शहराच्या विविध भागात लावण्याचा मानस बेले यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)विविध गुणधर्मांची वनस्पतीलक्ष्मीतारूच्या झाडाची पाने, रस, साल आणि मूळं औषधी गुणधर्मयुक्त समजली जाते. त्यामुळे त्यांचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये करण्यात येते. ही वनस्पती पहिल्या व दुसऱ्या पातळीवरील कॅन्सर रुग्ण, अल्सर, चिकनगुनिया, एन१एन१, हेपेटायटिस, अनिमिया आदी दुर्धर आजारांसह मलेरिया, हिवताप आदी तापांसाठी उपयुक्त समजली जाते. याशिवाय जमिनीचा कस भरून काढते. ४०० मि.मी. पावसावर लक्ष्मीतारूची लागवड करणे शक्य आहे. ही झाडे वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास हातभार लावत असतात.
कॅन्सर, टीबीवर गुणकारी लक्ष्मीतारूची लागवड
By admin | Updated: September 10, 2016 00:48 IST