शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गडीसुर्लात वृक्ष लागवडीचे झाले वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:00 IST

मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील स्मशानभूमी परिसरात पाच वर्षांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून .....

ठळक मुद्देचौकशीची मागणी : आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

शशिकांत गणवीर।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील स्मशानभूमी परिसरात पाच वर्षांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास चार लाख रुपये खर्च करून वटवृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र अल्पावधीतच ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी एकही वृक्ष जिवंत नसून स्मशानभूमी परिसर वृक्षाविना वाळवंट झाल्याचे दिसून येत आहे.ग्रामपंचायतीने प्रशासनाचे लाखो रुपये खर्च केले. संगोपनावरही खर्च करण्यात आला. मात्र लावलेल्या झाडाचे योग्यरित्या संगोपण करण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड कागदावरच केली की काय, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे. यात गैरव्यवहार झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.स्मशानभूमी परिसरात प्रशासनाने वृक्ष लागवडीकरिता प्रशासकीय मंजुरी प्रदान करून तीन लाख ७१ हजार ६१८ रुपये दिले. निधी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात आले.या परिसरात लावलेल्या वृक्षांचे योग्य संगोपण झाले असते तर आज या ठिकाणी हिरविगार वनराई फुलली असती. मात्र ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या उगवलेल्या बाभळीच्या झाडाव्यतिरिक्त फक्त माहिती फलकच उरल्याचे दिसते.येथील लोकप्रतिनिधी विकासाच्या नावावर ग्रामस्थाची दिशाभूल करीत आहेत. प्रत्यक्षात गावात विकास मात्र शून्य आहे. ग्रामपंचायतीवर पंधरा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. ग्रामस्थांनी काँग्रेसवर विश्वास टाकत सत्तेची चावी त्यांच्या हातात दिली. मात्र गावात विकासच होत नसल्याने नागरिकांची फसवणूक झाल्याचे गावात बोललग जात आहे.शासनाच्या योजना चांगल्या असल्या तरी त्यांना राबवणारे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या भ्रष्टपणामुळे शासनाच्या योजना राबविणाºयांसाठी कुरण ठरत आहेत. त्यामुळे गाव विकासाची भाषा करणारे राजकारणी मायाजाळ्यात अडकल्याचे दिसते. दुसरीकडे गावात मात्र दिवसेंदिवस समस्या वाढत चालल्या आहेत. स्मशानभूमी परिसरात लाखो रुपये खर्चुन लावलेल्या वट वृक्ष लागवडीची चौकशी करून दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.