शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालकांना बक्षीस देण्याची योजना संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

एसटीला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे खरे काम वाहक-चालक करतात. त्यामुळे त्यांना एसटीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हटले जाते. विशेष म्हणजे, देशभरातील सार्वजनिक परिवहन सेवेत एसटीच्या अपघाताचा दर सर्वाधिक कमी आहे. एक लाख किलोमीटर अंतरावर ०.१३ अपघात असा एसटीचा दर आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या पुरस्काराचे खरे मानकरी एसटीचे ३४ हजार चालक आहेत.

ठळक मुद्देमहामंडळाचे निर्देश : अपघातविरहित सेवा देणाऱ्या बसचालकांना मिळत होता सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकांना पूर्वी २६० दिवस अपघात विरहित सेवा दिल्यानंतर बक्षीस देण्याची योजना महामंडळाकडून राबविण्यात येत होती. आता ही योजना बंद करण्यात आली असून सर्व विभागस्तरावर या निर्देशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना १० जून रोजी देण्यात आल्या आहेत.एसटीला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे खरे काम वाहक-चालक करतात. त्यामुळे त्यांना एसटीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हटले जाते. विशेष म्हणजे, देशभरातील सार्वजनिक परिवहन सेवेत एसटीच्या अपघाताचा दर सर्वाधिक कमी आहे. एक लाख किलोमीटर अंतरावर ०.१३ अपघात असा एसटीचा दर आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या पुरस्काराचे खरे मानकरी एसटीचे ३४ हजार चालक आहेत. एसटी महामंडळाकडून २६० दिवस अपघात विरहित सेवा देणाऱ्या बसचालकांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येत होते. एसटी चालकांना १५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारीला हे बक्षीस देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जात होता. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.लॉकडाऊनमुळे एसटीच्या महसुलात लक्षणीय घट झाल्याने खर्चात काटकसर करून खर्च पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे ही अपघात विरहित बक्षीस योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत एसटीच्या चालकांना बक्षीेस देण्याची योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.लॉकडाऊनचा महामंडळाला जबर फटकाकोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन केले. संचारबंदीही लागू केली. त्यामुळे सर्वच उद्योग, आस्थापना, राज्यसीमा, जिल्हासीमा बंद झाल्या. दळणवळणही बंद झाले. एसटी प्रवासातून कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे ग्रामीण जीवनातील महत्त्वाचा घटक असलेली व सर्वांच्या जिवाभावाची लालपरी २३ मार्चपासून डेपोत बंदीस्त झाली. तब्बल अडीच महिने बससेवा बंद राहिली. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. आता बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवाश्यांची मर्यादा आहे. शिवाय अनेकजण बसप्रवास टाळत असल्याने महामंडळ तोट्यातच आहे.

टॅग्स :state transportएसटी